मुंबई, 20 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत खळबळ उडवून दिली आहे. या पत्रातून परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला आहे.
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनीच असे गंभीर आरोप केल्यानंतर भाजपनेही सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'आता हे स्पष्ट झालं आहे की हे सरकार भ्रष्ट आहे,' अशी टीका भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत, परमवीर सिॅग यांचे धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याच विडाच उचलला आहे. @AnilDeshmukhNCP यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा @OfficeofUT यांनी त्यांना काढायला हवे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 20, 2021
परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.
परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 20, 2021
बातमी अपडेट होत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.