महाराष्ट्राचा महासंग्राम : परळीमध्ये भावा-बहिणीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष

महाराष्ट्राचा महासंग्राम : परळीमध्ये भावा-बहिणीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष

परळीमध्ये कोणतीही निवडणूक असली तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना पाहायला मिळतो. आता विधानसभेतही या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

परळी, 18 सप्टेंबर : परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हीच लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडेंना परळीमधून उमेदवारी दिली आहे.

2009 मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. यावेळी पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि आमदार झाल्या.

या निवडणुकीत पंकजा मुंडेंना आमदारकीचं तिकीट मिळाल्यामुळे नाराज झालेल्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धनंजय मुंडे विधान परिषदेत आमदार झाले.

गोपीनाथ मुंडेंचा वारसा

परळी मतदारसंघ पूर्वी रेणापूर म्हणून ओळखला जायचा. या मतदारसंघात एखादा अपवाद वगळला तर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पूर्वीच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे 5 वेळा आमदार झाले. 1985 ला मात्र पंडितराव दौंड यांनी गोपीनाथ मुंडेंचा पराभव केला. 2009 मध्ये पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. त्यानंतर 2 वेळा इथून पंकजा मुंडे आमदार झाल्या.

शरद पवारांची मोठी घोषणा, बीडमधील 5 उमेदवारांची नावं जाहीर

परळीमध्ये कोणतीही निवडणूक असली तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना पाहायला मिळतो. 2016 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या गटाने बाजी मारली. पंकजा मुंडे मंत्री असतानाही परळी नगरपालिकेत सत्ता आणू शकल्या नाहीत याची त्यावेळी खूपच चर्चा झाली. यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला.

प्रीतम मुंडे झाल्या खासदार

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हाच संघर्ष पाहायला मिळाला. मात्र भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात 19 हजारांचं मताधिक्य मिळालं.

पंकजा मुंडे या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री असल्याने परळीमध्ये त्यांचा दबदबा आहे. परळी विधानसभा मतदारसंघातल्या विकासकामांसाठी त्यांनी भरीव निधी आणला. त्यांचं हे काम आता त्यांना इथे पुन्हा एकदा विजय मिळवून देईल का ते पाहावं लागेल.

2014 विधानसभा निवडणुकीतली मतं

पंकजा मुंडे, भाजप - 96 हजार 904

धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस - 71 हजार 009

प्रा. टी. पी. मुंडे, काँग्रेस - 14 हजार 946

======================================================================================

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 04:03 PM IST

ताज्या बातम्या