मोबाईलची बॅटरी चार्ज करताना झाला स्फोट, तरुणाला गमवावी लागली बोटं !

मोबाईलची बॅटरी चार्ज करताना झाला स्फोट, तरुणाला गमवावी लागली बोटं !

स्मार्ट फोनच्या जमान्यात मोबाईलचा वाढत चाललेला वापर तुमच्या चांगल्याच जीवाशी येऊ शकतो याचा अनुभव परभणीच्या मानवत मधील महाविद्यालयीन तरुणाला आलाय.

  • Share this:

पंकज क्षीरसागर, परभणी

परभणी, 24 मार्च : स्मार्ट फोनच्या जमान्यात मोबाईलचा वाढत चाललेला वापर तुमच्या चांगल्याच जीवाशी येऊ शकतो याचा अनुभव परभणीच्या मानवत मधील महाविद्यालयीन तरुणाला आलाय.

मानोलीत राहणाऱ्या सोमेश्वर तळेकरचा जीव थोडक्यात बचवला. त्याच्या उजव्या हाताची तीन बोटं निकामी झालीयेत तर डाव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर इजा झालीय. सोमेश्वर मोबाईलची बॅटरी चार्ज करत असताना त्या बॅटरीचा स्फोट झाला आणि त्याला ही गंभीर दुखापत झालीये. सोमेश्वरच्या वडिलांचा सहा महिन्यांपूर्वीच विजेचा शॉक बसून मृत्यू झालाय. त्यात मुलाला झालेला अपघात त्यामुळे त्याच्या आईला मानसिक धक्का बसलाय.

मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलणं, गेम खेळणं, बॅटरी ओव्हर चार्ज करणं असे प्रकार वाढलेत. त्यामुळे अशा अपघातांचं प्रमाणही वाढलंय. मोबाईलबरोबर येणाऱ्या माहितीपुस्तिका वाचून त्या सूचनांचं पालन केलं तर हे अपघात टाळता येऊ शकतात.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तसंच मोबाईलचंही झालंय. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या 7प्रत्येकानं वेळीच सजग होणं गरजेचं आहे.

First published: March 24, 2018, 11:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading