'परीक्षेला जायला उशीर झाला तर पेपर देता येणार नाही' - शिक्षण मंत्रालय

'परीक्षेला जायला उशीर झाला तर पेपर देता येणार नाही' - शिक्षण मंत्रालय

१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. 'कोणत्याही कारणानं परीक्षेला जायला उशीर झाला, तर पेपर देता येणार नाही.'

  • Share this:

06 फेब्रुवारी : १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. 'कोणत्याही कारणानं परीक्षेला जायला उशीर झाला, तर पेपर देता येणार नाही.' असा शिक्षण मंत्रालयानं आदेशच काढला आहे. साडे दहा वाजताच परीक्षा केंद्रात जाणं अपेक्षित आहे, त्यातही उशीर झाला तर जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत वर्गात जाऊ शकता. पण त्यानंतरही कोणाला यायला उशील झाला तर पेपर देता येणार नाही.

शिक्षण मंत्रायलयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी धावपळच होणार आहे त्यातही परीक्षा केंद्रापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र वेळेआधीच परीक्षेसाठी निघावं लागले. मंत्रालयाच्या या निर्णयावरुन विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची प्रतिक्रिया उमटत आहे.

कोणत्याही परिस्थितीत ११ नंतर प्रवेश दिला जाणार नाही. कारण पेपर उघडल्यावर त्याचे व्हॉट्सअॅपवर फोटो काढून ते पसरवण्याचे प्रकार वाढलेत. याला आळा घालण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

First published: February 6, 2018, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading