मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी : आणखी एका शहरात संचारबंदीची घोषणा; कुठे, कसे आहेत निर्बंध? जाणून घ्या

मोठी बातमी : आणखी एका शहरात संचारबंदीची घोषणा; कुठे, कसे आहेत निर्बंध? जाणून घ्या

पनवेल महानगरपालिकेनेही (Panvel Municipal Corporation) 10 दिवसांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे.

पनवेल महानगरपालिकेनेही (Panvel Municipal Corporation) 10 दिवसांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे.

पनवेल महानगरपालिकेनेही (Panvel Municipal Corporation) 10 दिवसांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

पनवेल, 11 मार्च : कोरोना रुग्णसंख्येत राज्यभरात वाढ होत असल्याने आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट वेढा घालू लागलं आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनाला (Coronavirus) रोखण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पनवेल महानगरपालिकेनेही (Panvel Municipal Corporation) 10 दिवसांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे.

पनवेलमध्ये 12 मार्च ते 22 मार्च या कालावधीत रात्री 11 ते पहाटे 5 च्या दरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई (Night Curfew) करण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, नवी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात सरासरी दररोज 50 ते 55 कोरोना रुग्ण आढळत होते. आता मात्र हा आकडा 150 वर पोहोचला आहे. यामुळेच आता नवी मुंबई महापालिकेकडूनही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता काही नियम कडक करण्यात आले आहे.

नवी मुंबईमधील हॉटेल्स, उपहार गृह जी पूर्वी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेशीत करण्यात आले होते, आता त्यांच्या वेळेत आता बदल करण्यात आले आहेत. हॉटेल, उपहारगृह, कॅफे, रेस्टॉरंट, कँटीन, डायनिंग हॉल व दुकाने 50 टक्के क्षमतेने आता रात्री 11 पर्यतच सुरू ठेवता येणार आहे. तर शहरातील इतर आस्थापने, मॉल हे रात्री 11 वाजेपर्यंत खुली होती ती आता नव्या आदेशाने 10 वाजेपर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आता देण्यात आली आहे.

हेही वाचा - 'राज ठाकरे तुमची महाराष्ट्राला गरज आहे', मुंबईच्या महापौरांनी मास्कबाबत केलं खास आवाहन

महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे नवीन नवीन नियमावली जाहीर करत नाही तो पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात 10 ते 12 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

वर्ध्यात 36 तासांची संचारबंदी

वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा तिसऱ्यांदा 36 तासांची संचारबंदी लागू केली आहे. मात्र कोरोनाची साखळी तुटत नाही. त्यामुळे हतबल झालेले प्रशासन काय भूमिका घेते हे पहावा लागणार आहे.

नांदेड

नांदेड जिल्ह्यात 12 मार्चपासून सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात पर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. औषधांची दुकाने यास अपवाद असतील. 12 मार्च ते 21 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद राहतील. तसंच सर्व आठवडी बाजारही बंद राहणार आहेत. लग्नासाठी 15 मार्चपर्यंत 50 लोकांना मुभा, 16 मार्च पासून लग्न समारंभ बंद करण्याच आदेश देण्यात आले आहेत.

नागपूर :

15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत लागू करण्यात आली आहे. पोलिसांना कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. या काळात उद्योग सुरू राहतील, सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थितीमध्ये सुरू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. तसंच अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Panvel