मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी 4 तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी 4 तरुणांनी केलं धक्कादायक कृत्य

गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

पनवेल, 24 जानेवारी : खारघर गोळीबारातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. कोपरा गावातील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या आरोपींच्या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हे आरोपी लूटमार करत असल्याचं पोलीस तपास स्पष्ट झालं आहे. विपीन ठाकूर, गोपाल सिंह, अभिनंदन शर्मा, मुचन ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. 24 तासांमध्ये हे चारही आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं. नेमकं काय घडलं? 23 जानेवारी रोजी प्रतीक रवींद्र आहेर 24 वर्षे इस्टेट एजंट रा.पेण शहर जि रायगड हा पेण येथून 3 वाजताच्या दरम्यान वाशी येथे त्याच्या दुचाकीने फिरण्यासाठी आलेला होता. त्यानंतर तो रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान कोपरा गाव बस स्टॉपच्या मागील रोडने आतमध्ये गेला आणि सिगरेट घेऊन ते पीत होता. त्याचवेळी तिथं तीन अनोळखी इसम त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची चावी मागू लागल्याने ते देण्यास नकार त्याने नकार दिला. प्रतीकने आपल्याकडील वस्तू देण्यास नकार देताच अनोळखी इसमांपैकी एक जण जबरदस्तीने मोबाईल ओढू लागला. त्याला विरोध केल्याने प्रतीक आहेर याच्या डाव्या पायाच्या मांडीवर शस्त्रातून एक गोळी फायर करून ते तिघेही पळून गेले. जखमीस पायामध्ये गोळी लागल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या एका इसमाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यास पुढील उपचारसाठी एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे दाखल केले. हेही वाचा - तरुणीच्या अकाऊंटवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली आणि गुरुजींचा घात झाला, बायकोचे दागिनेही मोडावे लागले! सदरची माहिती पोलिसांना मिळताच गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी होतं आणि फायरिंग करण्याचे कुठलेही ठोस कारण नसल्याने तपासला दिशा मिळत नव्हती. सकाळी खारघर परिसरातील सर्व cctv फुटेज तपासले. परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर कोपरा गावातील एकमेव कॅमेरा चेक केला असता 4 इसम त्यात कैद झाले होते. त्याबाबत गावात तपास केला असता कालच एका चाळीत 4 तरूण राहण्यास आल्याची माहिती मिळाली. तिथे दोन तास खारघर पोलिसांनी सापळा लावला असता 2 आरोपी तेथे आले, त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला व त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime news, Panvel

पुढील बातम्या