पनवेल, 24 जानेवारी : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना जबरी मारहाण करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चुनाभट्टीमधल्या एका हॉटेलबाहेर जगदीश गायकवाड यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.
जगदीश गायकवाड यांनी, एका महिन्यापूर्वी एका व्यक्तीसोबत फोनवर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आणि आरपीआय नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शिवीगाळ केली होती. तेव्हापासून जगदीश गायकवाड यांच्याविरोधात जोरदार आंदोलन छेडलं गेलं होतं.
पनवेलच्या माजी उपमहापौरांना जबरी मारहाण, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला pic.twitter.com/2NUAdIw3s3
— News18Lokmat (@News18lokmat) January 24, 2023
जगदीश गायकवाड यांच्या या व्हायरल क्लिपनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. जगदीश गायकवाड हे एका हॉटलेमध्ये गेले असताना रात्रीच कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या विरोधात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी चुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.