नगरसेवकाच्या मुलांची गुंडगिरी, तरुणाच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बाटल्या

नगरसेवकाच्या मुलांची गुंडगिरी, तरुणाच्या डोक्यात फोडल्या बिअरच्या बाटल्या

पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुलं आणि भाच्यानं एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे.

  • Share this:

पनवेल, 6 ऑगस्ट : कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुलं आणि भाच्यानं एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. विश्वनाथ गायकवाड असं तरुणाचं नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. पनवेल येथील रोडपालीजवळच्या गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर सोमवारी (5 ऑगस्ट)रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

(वाचा : लज्जास्पद! घरात एकट पाहून मामानं केला भाचीवर बलात्कार)

नेमकं काय आहे प्रकरण?

या नगरसेवक पुत्र आणि भाच्यानं दोन दिवसांपूर्वी विश्वनाथ गायकवाडचा भाऊ सिद्धार्थला मारहाण केली होती. त्यानं याविरोधात तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात ठेवून विश्वनाथवर जीवघेणा चढवला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही कारणावरून जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी सिद्धार्थला मारहाण केली होती. याबाबत त्याने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र आम्ही नगरसेवकाची मुले असल्यानं आमच्या विरोधात कोण तक्रार दाखल करू शकतो? असं म्हणत जगदीश गायकवाड यांची मुले सिद्धार्थचा शोधत घेत होती. मात्र तो हाती न लागल्यामुळे याचा राग त्यांनी विश्वनाथवर काढला.

(वाचा : JNUच्या विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन टॅक्सी ड्रायव्हरचा बलात्कार)

दरम्यान, या प्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ठाणेकरांनो, तुम्ही घेतलेली फळं एरिअलमध्ये तर धुतली नाही ना? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या