पनवेल,भिवंडी आणि मालेगाव पालिकांचं 24 मे रोजी मतदान

पनवेल,भिवंडी आणि मालेगाव पालिकांचं 24 मे रोजी मतदान

पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या महापालिकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार आहे

  • Share this:

19 एप्रिल : राज्यातील तीन महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलंय. पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या महापालिकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार आहे. तर 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

10 महापालिकांची निवडणूक पार पडल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन महापालिका निवडणुकीची घोषणा केली.

चंद्रपूर आणि लातूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या महापालिकांची निवडणूक होणार आहे. या तिन्ही महानगपालिकांसाठी 24 मे रोजी मतदान होईल. आणि 26 मे 2017 रोजी मतमोजणी होणार आहे.  तिन्ही मनपा क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

 

पनवेल महापालिका

 भिवंडी-निजामपूर महापालिका

 मालेगाव महापालिका

मतदान - 21 मे 2017

मतमोजणी - 22 मे 2017

आचारसंहिता आजपासून लागू

First published: April 19, 2017, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading