Bhiwandi, Panvel, Malegaon Election Results 2017 Live : पनवेलमध्ये भाजप तर भिवंडी-मालेगावमध्ये काँग्रेस !

Bhiwandi, Panvel, Malegaon Election Results 2017 Live : पनवेलमध्ये भाजप तर भिवंडी-मालेगावमध्ये काँग्रेस !

  • Share this:

===========================================================

भिंवडीत काँग्रेसची एक हाती सत्ता

स्थानिक निवडणुकीत अपयशाला सामोरं जाणाऱ्या काँग्रेसला भिंवडीकरांनी साथ दिली. भिंवडी महापालिकेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एक हाकी सत्ता राखलीये.

भिंवडी-निजामपूर महापालिकेच्या 90 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत आपला गड कायम राखलाय. काँग्रेस सर्वाधिक 47 जागा जिंकल्यात. या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजुने कौल येईल अशी चिन्ह होती. पण, मतदारांनी सेनेला संधी दिली नाही.

मागील निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागेत निम्म्याहुन अधिक वाढ झालीये. तर भाजपने शिवसेनेला जोरदार टक्कर देत दुसरे स्थान पटकावले आहे. भाजपला मागील निवडणुकीत 8 जागा मिळाल्या होत्या.

यावेळी 19 जागांवर मुसंडी मारलीये. शिवसेनेनं 12 जागा मिळवत तिसऱ्या स्थानावर फेकली गेलीये. तर भिंवडीत राष्ट्रवादीला अंतर्गत मतभेदाचा फटका बसला. राष्ट्रवादीला इथं भोपळाही फोडता आला नाही. स्थानिक निवडणुकीत सतत पराभवाने खचलेल्या काँग्रेसला भिंवडीतला विजय नक्कीच दिलासादायक ठरणारा आहे.

भिंवडी महापालिकाचा निकाल

एकूण जागा - 90

बहुमतासाठी आकडा - 46

काँग्रेस- 47

भाजप- 19

शिवसेना- 12

कोणार्क-४

समाजवादी-2

आरपीआय एकतावादी - ४

राष्ट्रवादी-0

अपक्ष 2

==================================================================

मालेगावमध्ये भाजपचं 'मुस्लिम कार्ड'फेल, काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात  विजय मिळवल्यानंतर मालेगाव सारख्या मुस्लिमबहुल भागातही भाजपने पुन्हा मुस्लिम कार्ड टाकलं. पण, मतदारराजाने साफ धुडकावून लावत चौथ्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या भाजप सरकारला ताळ्यावर आणलं. मालेगावमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, कुणाच्याही हाती एकहाती सत्ता न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये.

मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर 83 जागांवर कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहण्यास मिळाली. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा पटकावल्या आहे. 28 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर राष्ट्रवादीने 20 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. शिवसेनेनं 13 जागा जिंकत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर भाजप चौथ्या स्थानावर फेकलं गेलं. भाजपला 9 जागा मिळाल्यात. तर एमआयएमला 7 जागांवर समाधान मानावं लागलं.

विशेष म्हणजे हिंदूत्वाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपने मुस्लिमबहुल भागात उमेदवारांना तिकिटांचं वाटप केलं होतं. एकूण 27 मुस्लिम उमेदवारांनी तिकिटांचं वाटप केलं होतं. यात 16 महिलांचा समावेश होता. परंतु, भाजपने खेळलेलं मुस्लिम कार्ड सपेशल अपयशी ठरलं. मतदारराजाने भाजपची रणनीती उधळवून लावली. विशेष म्हणजे भाजपने 56 उमेदवार दिले होते. त्यापैकी फक्त 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसने सर्वाधिक 76 उमेदवार दिले होते. एमआयएमने यावेळी मालेगाव निवडणुकीत उडी घेत 35 उमेदवार दिले होते. मात्र, त्यापैकी फक्त 7 चं उमेदवार विजयी झाले.

मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या पारड्यात फक्त 3 जागा आणखी मिळाल्यात. तर राष्ट्रवादीच्या 2 जागा घटल्या अशून 22 वरून 20 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने मागील निवडणुकीत भोपळाही फोडला नव्हता. मात्र यावेळी 9 जागा जिंकल्यात. तर मागील निवडणुकीत 2 जागा जिंकणाऱ्या मनसेला यंदा भोपळाही फोडता आला नाही.

हिंदुत्त्व आणि मुस्लिम कार्ड खेळणाऱ्या राजकीय पक्षांना एकहाती सत्ता न देत मतदारराजाने सत्तेसाठी या पक्षांच्या पायात पाय अडकवून दिले आहे.

==========================================

पनवेल महापालिकेचा भाजपच्या सत्तेनं 'शुभारंभ'

पहिल्यांदाच निवडणूक होणाऱ्या पनवेल महापालिकेत भाजपने सत्तेचा 'श्रीगणेशा' केलाय. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पालिकेवर झेंडा फडकावलाय.

नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिका आपल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीला सामोरं गेली. 78 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सकाळपासून भाजपने आघाडी घेत आता बहुमतात बदलली आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार करत 44 जागा पटकावल्या आहेत.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात भाजपने महापालिका जिंकत मोदी सरकारला विजयी भेट दिलीये.

पनवेल  महापालिका निवडणूक

भाजप 44

शेकाप - 17

राष्ट्रवादी -1

काँग्रेस -01

शिवसेना - 0

इतर - 0

 एकूण जागा 78

मॅजिक फिगर -40

====================================================================

First published: May 26, 2017, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading