कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पंकजा मुंडे-धनंजय मुंडे आमनेसामने

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पंकजा मुंडे-धनंजय मुंडे आमनेसामने

मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केलेत, तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यांनी स्व. पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार रिंगणात उतरवलेत.

  • Share this:

14 मे : परळीतली कोणतीही निवडणूक अलीकडे मुंडे बंधू-भगिनींच्या अस्तित्वाची ठरताना दिसतेय. परळीत आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८  जागेसाठी निवडणूक होतेय. यासाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावतायत.

मंत्री पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केलेत, तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यांनी स्व. पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार रिंगणात उतरवलेत.

मागल्या दोन टर्म बाजार समिती धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. यावेळी सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी रणनीती आखालीय. तर धनंजय मुंडे हे तिसऱ्यांदा परळीत पंकजा मुंडेंना चितपट करण्यासाठी सरसावलेत.

आठ मतदान केंद्रांवर ही निवडणूक होत असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2017 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading