VIDEO : लोकांची घरं फोडण्याचं पाप आम्ही केलं नाही, धनंजय मुंडेंना टोला

VIDEO : लोकांची घरं फोडण्याचं पाप आम्ही केलं नाही, धनंजय मुंडेंना टोला

'रक्ताची नाती जेव्हा तुटतात तेव्हा त्याची वेदना काय असते ते मी भोगलं आहे.'

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 06 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मुंडे घराण्याचं कायम वर्चस्व आहे. अतंर्गत राजकारणामुळे धनंजय मुंडे यांनी आपला वेगळा मार्ग निवडला. मात्र त्याची सल अजुनही पंकजा मुंडे यांना जाणवत असते. बीड नगरपरिषदेच्या कार्यक्रमातही त्यांनी बुधवारी ती व्यक्त केली. राजकारणात सुसंस्कृतपणा पाळावा असे संकेत आहे. कुणाचं घर फोडून राजकारण करू नये असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला.

सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "घर फोडण्याचं पातक लागू नये, एवढ्या खालच्या पातळीच राजकारण नसावं. राजकारणातही काही गोष्टी पाळल्याच पाहिजेत. रक्ताची नाती जेव्हा तुटतात तेव्हा त्याची वेदना काय असते ते मी भोगलं आहे. त्यामुळे असाच प्रसंग जेव्हा जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात आला तेव्हा मी त्यांच्या पाठिशी राहिले."

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड नगरपालिकेला दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली. ही पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तर विकासाच्या कामात आम्ही राजकारण केलं नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

बीड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. बीड नगर पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असल्याने राजकीय चर्चे झाली नसती तरच नवल.

पंकजा मुंडे यासुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे दोन आमदार वगळता राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना आव्हान दिल्याच्या चर्चेला उधाण आलंय.

या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका किंवा बॅनरवर कुठेही धनंजय मुंडे यांचा फोटोही पाहायला मिळत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढती नाराजी पक्षाला हानिकारक ठरणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय.

First published: February 6, 2019, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading