Home /News /maharashtra /

BREAKING : पंकजा मुंडेंना डावललं, नगरमध्ये कट्टर समर्थकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

BREAKING : पंकजा मुंडेंना डावललं, नगरमध्ये कट्टर समर्थकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

 मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

अहमदनगर, 09 जून : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja Munde)  यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थक ठिकठिकाणी निदर्शनं करत आहे. तर अहमदनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या एक समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थक संतापले आहे. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील पंकजा मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (LIC शेअरमध्ये घसरण सुरुच, गुंतवणूकदारांनी पुढे काय करावं?) मात्र पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना सातत्याने राजकारणात स्वतःच्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. औरंगाबादेत भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ दरम्यान, औरंगाबाद (Aurangbad) येथील पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ (Munde supporters protest outside Aurangabad BJP office) घातला. पंकजा मुंडे यांचे समर्थक दुपारच्या सुमारास भाजप कार्यालयात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. (तर पशुसंवर्धन विभागाच्या दारात शेतकरी पायतान घेऊन जाब विचारणार : राजू शेट्टी) पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. तसंच पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या