बीड, 15 नोव्हेंबर : बीडमध्ये (beed) प्रियकराने प्रेयसीवर अॅसिड टाकून पेट्रोलने पेटवून दिल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही या 'प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी', अशी मागणी केली आहे.
न्यूज18 लोकमतशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये सावित्रा अंकुलवार तरुणीच्या हत्ये प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
'दिवाळी सण असताना, पाडवा आणि भाऊबीज उद्या होणार आहे. हा सण महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण काही विकृत घटना घडताना दिसत आहे. दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणे दुर्दैवी आहे' अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
'मुलीच्या बदल्यात मुलगी' म्हणत पुण्यामध्ये धक्कादायक अपहरणाची घटना
तसंच, 'महिला अत्याचार गोष्टी राज्यात सातत्याने होत आहे. अशा गोष्टी थांबवण्यासाठी वेगळी फोर्स तयार करण्याची आवश्यकता आहे. फास्ट ट्रॅकमध्ये असे खटले चालवले पाहिजेत. मी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बीडचे एसपी यांच्याशी बोलणार आहे' असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
'एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, 12 तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी' अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
बीडमध्ये प्रेयसीवर अॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जखमी अवस्थेत पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अडीज लाख नागरिकांच्या मृत्यूनंतर US मध्ये कोरोनाचा कहर अधिक वाढला
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.
काश्मीरमध्ये हंगामातली पहिली बर्फवृष्टी; मुंबईकर लुटतायत आनंद ! Exclusive Video
पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपी अविनाश राजुरेचा शोध घेत आहे.