मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Vinayak Mete : सकाळी आलेले फोन नकारात्मक असतात, पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे आणि मेटेंच्या आठवणींना दिला उजाळा

Vinayak Mete : सकाळी आलेले फोन नकारात्मक असतात, पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे आणि मेटेंच्या आठवणींना दिला उजाळा

'विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल मला सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मला फोन आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    बीड, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मेटे यांच्या अचानक एक्झिटमुळे महाराष्ट्र हळहळला आहे. बीडच्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मेटे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल मला सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मला फोन आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे यापेक्षा वाईट बातमी येऊ शकते असं सांगितलं होतं. थोड्यावेळाने कन्फर्म केला तेव्हा कळलं की विनाय मेटे यांचं निधन झालं. याचा मला धक्का बसला, सकाळी आलेले फोन नकारात्मक असल्याचे आजपर्यंतचा मला अनुभव आहे' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. '52 वर्षांच्या वयात त्यांचं निधन झालं. राजकारणामध्ये हे वय कमी आहे. उमेदीचा त्यांचा काळ होता. राजकीय क्षेत्रात त्यांनी बुद्धी आणि नियोजनाच्या जोरावर पदं मिळवली. मराठा आरक्षणासाठी त्यांनी कामं केली. मी 22-23 वर्षांची होती. मराठा तरुणांच्या एका संघटनेपासून त्यांची ओळख झाली. तेव्हा पासून त्यांच्यासोबत काम करतेय, खूप प्लॅनिंग त्यांचं चांगलं होतं. काही गोष्टी त्यांना समजायच्या त्या ग्रामीण भागात राहून सगळं काही सांगायचं. एवढा हुशार नेता, बीडचा भूमिपूत्र हरवला, याबद्दल फार वाईट वाटत आहे, अशी भावना पंकजांनी व्यक्त केली. 'माझं नवीन लग्न झालं होतं, त्यावेळी मेटे यांनी सर्व नेत्यांना एकत्र घेऊन कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे सुद्धा हजर होते. त्यावेळी मी खूप लहान होते. संघर्ष यात्रेमध्येही ते माझ्यासोबत सहभागी होती. अलीकडे सागर बंगल्यावर त्यांची भेट झाली होती. १५ ऑगस्टनंतर आम्ही भेटणार असं ठरलं होतं. पण आता ती भेट होणार नाही, अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या