'त्या' वादानंतर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

'त्या' वादानंतर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

जे वक्तव्य करण्यात आलं ते महिलांचा अवमान करणारं आणि सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासणार आहे.

  • Share this:

परळी 21 ऑक्टोंबर : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. आता त्या वादावर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलंय. मतदानाच्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जे वक्तव्य करण्यात आलं ते महिलांचा अवमान करणारं आणि सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासणार आहे. खोटेपणा आणि दाभिकपणाचा मला राग आलाय. राजकारणाची ही जी पातळी खालावली ती चीड आणणारी आहे. लोकांना खरे अश्रू आणि खोटे अश्रू कळतात. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यावरही मला ते अश्रू आढळले नाही असा टोलाही त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

महाराष्ट्राच्या तरुणाचं स्वप्न पूर्ण होणार,थेट PM मोदींनी घालतं प्रकल्पात लक्ष

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आपण धिक्कार करतो. निवडणुकीतील पराभवाच्या भितीने टीका करताना धनंजय मुंडे यांनी किमान मर्यादा पाळायला हवी होती आणि भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. या धक्कादायक वक्तव्याबद्दल धनंजय मुंडे यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईवर लष्कर प्रमुखांचा मोठा खुलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या समाजहिताच्या कामामुळे त्यांना असलेला जनतेचा पाठिंबा आणखी वाढला आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे तेथे जनता त्यांच्या पाठीशी आहे.अशा स्थितीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याकडून आपला पुन्हा एकदा पराभव होणार, असे ध्यानात आल्यामुळे धनंजय मुंडे हताश झाले. त्यांची निराशा समजू शकते. पण त्यामुळे त्यांनी प्रचारात पातळी सोडून असे अश्लाघ्य वक्तव्य करणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांनी राजकीय स्वार्थासाठी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्व सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. आपण त्यांच्या विधानाचा धिक्कार करतो.

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना जवान शहीद

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी पराभूत केले होते. या विधानसभा निवडणुकीत आपला पुन्हा एकदा पराभव होणार याची जाणीव झाल्यामुळे धनंजय मुंडे यांचा तोल गेला आणि त्यांनी आपल्या बहिणीविषयी अत्यंत धक्कादायक टिप्पणी केली. त्यांचे हे विधान राजकीयदृष्ट्या सर्व मर्यादा ओलांडणारे आहेच व त्यासोबत बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 09:05 PM IST

ताज्या बातम्या