मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत माहिती समोर

पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत माहिती समोर

विधान परिषद निवडणुकीमध्येही पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नव्हती. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत

विधान परिषद निवडणुकीमध्येही पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नव्हती. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत

विधान परिषद निवडणुकीमध्येही पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नव्हती. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी लवकरच मार्गी लागणार आहे. शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार केली जात आहे. मात्र, या यादीमध्ये पंकजा मुंडे (pankaja munde) यांचं नाव नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले जाण्याची शक्यता आहे.

शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाले आहे. सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. मविआ सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. आता ही यादी नव्याने तयार केली जात आहे. मात्र, ही यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल नवीन माहिती उघड केली आहे.

(आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी वीज चोरी; VIDEO समोर येताच महावितरणाची कारवाई)

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला आहे. ज्या पद्धतीने तिकीट द्यायचं आणि सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. आता माझ्या पंकजा मुंडे यांच्याही लवकर लक्षात यायला पाहिजे. कारण, 12 आमदारांची यादी आहे, ती यादी राज्यपाल लवकरच मान्य करतील. मुळात राज्यपालच भाजपचे आहे. पण मला असं समजलं की दुर्दैवाने 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे आपला पक्ष प्रामाणिकपणे वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. रोहिणी खडसे यांना पुढचं भविष्य लवकर कळलं, त्यांनी लगेच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पंकजा ताईंना सुद्धा याची जाणीव असावी किंवा असेल, त्यामुळे त्यांनी पाऊल उचलावी, असा सल्लाच मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

(ते कधी चुकीचं वागू शकत नाही'; किशोरी पेडणेकरांनी केलं शिंदेंचं कौतुक, पण पुढे..)

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा रंगली होती. पण, खातेवाटपामध्ये पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नाही. खुद्द पंकजा मुंडे यांनीच सरकार स्थापन करण्यामध्ये आपले योगदान हे खारीचे सुद्धा नाही, असं म्हणत भूमिका स्पष्ट केली होती. त्याआधी विधान परिषद निवडणुकीमध्येही पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नव्हती. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतही पंकजा मुंडेंचे नाव वगळण्यात येईल की संधी दिली जाईल हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published:

Tags: Lokmat news, Lokmat news 18, Marathi news, पंकजा मुंडे