• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर अन् पंकजांची तब्येत बिघडली, भेट घेणं टाळलं?

फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर अन् पंकजांची तब्येत बिघडली, भेट घेणं टाळलं?

देवेंद्र फडवणीस हे पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा अतिरिक्त पावसाचा दौऱ्यावर आहे. त्यातच पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडली आहे

देवेंद्र फडवणीस हे पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा अतिरिक्त पावसाचा दौऱ्यावर आहे. त्यातच पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडली आहे

देवेंद्र फडवणीस हे पुढील 3 ते 4 दिवस मराठवाडा अतिरिक्त पावसाचा दौऱ्यावर आहे. त्यातच पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडली आहे

 • Share this:
  मुंबई, 01 ऑक्टोबर : भाजपच्या (bjp) नेत्या आणि माजी महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांची अचानक प्रकृती खराब झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येण्याआधीच पंकजा मुंडे (pankaja munde tweet) यांनी काढता पाय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून प्रकृती खराब झाल्याबद्दल माहिती दिली आहे.  घशाला त्रास होत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पुढील 2 ते 4 दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला, त्यामुळे कुणाचेही फोन कॉल घेऊ शकत नाही किंवा वैयक्तिकरित्या भेटू शकत नाही' अशी माहिती पंकजांनी दिली आहे. दरम्यान, देवेंद्र फडवणीस हे पुढील तीन चार दिवस मराठवाडा अतिरिक्त पावसाचा दौऱ्यावर आहे. त्यातच पंकजा मुंडे यांची अचानक तब्येत बिघडली आहे. पंकजा यांनी तब्येतीच कारण पुढे केल्यामुळे त्यांना  फडणवीस यांच्या दौऱ्यात सामिल होता येणार नाही. . बापरे! 2 महिने बाटलीत अडकला त्याचा प्रायव्हेट पार्ट; डॉक्टरांनी कापूनच टाकला विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण, त्यांच्याऐवजी भागवत कराड यांची वर्णी लागली. प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे पंकजा मुंडे कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यांच्या अनेक समर्थक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. पंकजा मुंडे यांनीही दिल्लीवारी करून वरिष्ठांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. 'फोनवर कोणाशी बोलत होती'', पतीनं विचारताच महिलेनं संपवलं आयुष्य या घटनेनंतर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस शक्यतो आमनेसामने आले नाही. मध्यंतरी दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक पार पडली होती. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेळी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते, पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांपासून अंतर राखलं होतं. आताही पंकजा मुंडे यांनी खरंच फडणवीस यांना टाळलं का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: