मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला प्रारंभ, गोपीनाथगड ते भगवान भक्ती गड रॅलीला सुरुवात

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला प्रारंभ, गोपीनाथगड ते भगवान भक्ती गड रॅलीला सुरुवात

बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होवून प्रीतम मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली

बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होवून प्रीतम मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली

बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होवून प्रीतम मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 05 ऑक्टोबर : दसराच्या निमित्ताने राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबईत शिवसेनेच्या दोन गटाचे मेळावे होणार आहे. तर बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनी रॅलीला सुरुवात केली आहे.

बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होवून खा डॉ प्रीतम मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली आहे. ही रॅली बीड-सिरसाळा - दिंद्रुड - तेलगाव - वडवणी - घाटसावळी - बीड - पाटोदा मार्गे सावरगावघाट येथे भगवान भक्ती गडावर पोहोचणार आहेत.

(Dasara Melava : मुख्यमंत्र्यांची 'मोदी स्टाईल', दसरा मेळाव्यात पुन्हा ठाकरेंवर 'सर्जिकल स्ट्राईक' करणार!)

दुपारी 12 वाजेपर्यंत पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवान भक्ती गडावर पोहोचतील. त्यानंतर प.पू. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. दुपारी 12.55 वाजेच्या सुमारास पंकजा मुंडे भाषणाला सुरुवात करणार आहे.

पंकजाताई काय बोलणार यांची मलाही उत्सुकता-प्रीतम मुंडे 

'महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत. पंकजाताई काय बोलणार यांची मलाही उत्सुकता आहे. लोकस्वयंस्फूर्तीने येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दसरा मेळावा समितीने काळजी घेतली आहे. परळी येथील गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड रॅली काढणार आहे. रस्त्यात सर्व लोकांच्या भेटी घेत आहे सावरगाव घाट येथे गडावर पोचणार आहे. मला देखील पंकजाताई काय बोलणार याची उत्सुकता आहे असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.

भाविक भक्तासाठी पिठल भाकरीची सोय

भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या बीडच्या सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी पुर्ण झाली. यंदा मेळाव्यासाठी ५० बाय ३० आकाराचे व्यासपीठ असून मुख्य सभास्थळापासून ३०० मीटर अंतरावर २५ एकरांत वाहनतळ उभे करण्यात आले आहे. पंकजा मुंडे या मुंबई वरुन थेट हेलिकॉप्टरने सावरगावात येणार आहे.

(Dasara Melava : शिवसेनेमध्ये जे आजपर्यंत कधी घडलं नाही, ते आज घडणार!)

संत भगवानबाबा स्मारक परिसरासमोरील मैदानावर दोन लाख लोक थांबतील अशी व्यवस्था करण्यात आली असून मेळाव्याच्या सुरक्षेसाठी पाचशे पोलीस असणार आहेत. लांबून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी राहण्याची आणि पिठल भाकरीची सोय ग्रामस्थांनी केली असल्याचे संत भगवानबाबा ट्रस्टचे अध्यक्ष संदेश सानप यांनी सांगितले.

First published:

Tags: Marathi news