पंकजा मुंडे संतापल्या, म्हणाल्या निर्णय झाला असताना कोण आहे झारीतले शुक्राचार्य?

पंकजा मुंडे संतापल्या, म्हणाल्या निर्णय झाला असताना कोण आहे झारीतले शुक्राचार्य?

ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या. त्यांचा संयम सुटणार नाही, याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी 15 दिवस आहेत.

  • Share this:

बीड,15 एप्रिल: भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आगपखाड केली आहे.

ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या. त्यांचा संयम सुटणार नाही, याची काळजी घ्या. ते एका ठिकाणी 15 दिवस आहेत. एकही साधा शिंकला नाही, मग काय चिंता आहे. त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य?? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी सरकार आगपाखड केली आहे.

आम्हाला श्रेय ही नको, पण निर्णय करा. हा विषय राज्याच्या अधिकारात आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

काय आहे पंकजाचं ट्वीट...

दरम्यान, ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी गेल्या दोन-तीन आठवडयापासून पंकजा मुंडे सातत्याने प्रयत्न करत आहेत. पंकजा मुंडे यांच्यामुळे राज्यातील ऊसतोड कामगार आपापल्या घरी परतण्याची आशा पल्लवित झाली होती. राज्य सरकारकडून याबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय देण्यात येणार होता. ऊसतोड कामगारांना स्वगृही पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना नेमकं कुठं अडलं. कोण झारीतले शुक्राचार्य?? असा सवाल पंकजा मुंडे यांनी सरकारला केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. यातील बहुतांश कामगार हे बीड, अहमदनगर तसेच अन्य जिल्हयातील आहेत. हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे, अशी मागणी पंकजा मुंडे गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून करत आहेत. पंकजा यांनी सरकारला लेखी निवेदन, दूरध्वनी, ट्वीट अशा माध्यमातून सातत्याने मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी पंकजा यांनी फोनवरही संवाद साधला होता.

संयम बाळगा, सकारात्मक निर्णय होईल...

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात याआधी ट्वीट करुन त्यांना धीर दिला होता. संयम बाळगा, सकारात्मक निर्णय होईल, असं पंकजांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे समस्त ऊसतोड कामगारांनी थोडासा दिलासा मिळाला होता.

संबंधित - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या जवळ, मृत्यूची संख्या 187वर

Plasma Therapy कोरोनावर उपचार होण्याची शक्यता; असं वाचवलं जाणार रुग्णांना

First published: April 15, 2020, 9:47 PM IST

ताज्या बातम्या