छिचोरे चाळे बंद करा.. पंकजा मुंडेंनी नामोल्लख न करता धनंजय मुंडेंना सुनावलं

छिचोरे चाळे बंद करा.. पंकजा मुंडेंनी नामोल्लख न करता धनंजय मुंडेंना सुनावलं

महाराष्ट्रात कुठेही पंचायत समितीचे उद्घाटन असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समितीचे उद्घाटन सुद्धा माझी एनओसी घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. परळीचे काय घेऊन बसले.

  • Share this:

बीड,13 जुलै- महाराष्ट्रात कुठेही पंचायत समितीचे उद्घाटन असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समितीचे उद्घाटन सुद्धा माझी एनओसी घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. परळीचे काय घेऊन बसले. छिचोरे चाळे बंद करा, अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी नामोल्लख न करता धनंजय मुंडेंना सुनावलं.परळी पंचायत समितीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी सगळा प्रोटोकॉल पाळते. मी कधीच म्हणत नाही याचं नाव का? आणि त्याचे नाव का? जे शासनाच्या योजनाचा सन्मान करत नाहीत. गेल्या पाच वर्षांत एकही जिल्हा नियोजनची बैठक विरोधीपक्ष नेत्यांनी केली नाही. ते राज्यभर भाषण करत फिरतात. जिल्ह्यातल्या कुठल्या प्रश्नाला न्याय दिला. मी या इमारतीला निधी दिला, आमदार म्हणून मागणी माझी होती. पण काल काही टोळक्याने उद्घाटन केलं, हे असे छिचोरं वागणं बर नव्हं..हे राजकरणात चुकीचे. ते सत्तेत होते. जयंत पाटील ग्रामविकास मंत्री होते तेव्हा का? आणला नाही निधी, म्हणे प्रयत्न केले. माझ्या मंत्रालयात एक कागदाचे शिफारस पत्र नाही. मग असं वागणं हे राजकरणात खाली मान घालायला लावणारे आहे. उद्घाटन केल्याने कोणी लहान आणि मोठं होतं नाही.असं त्या म्हणाल्या. उद्घाटन नाट्याची अशा गोष्टीची तीव्र निंदा करते. येणाऱ्या काळात परत मीच पाच वर्षांसाठी मंत्री म्हणून निवडून येणार आहे. विरोधक कितीही प्रयत्न करत राहतील, पण ते कधीच यशस्वी होणार नाहीत. तर त्यांना आयुष्यभर अशाच पद्धतीने रात्रीलाच गुपचूप उद्घाटन करत राहावे लागणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. मी त्यांना कधीही वरचढच राहणार आहे आणि त्यांच्या वरचं राहणार आहे, अशी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली.

महाराष्ट्रामध्ये हाय होल्टेज लढत म्हणून परळीच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुंडे बंधू-भगिनींचा संघर्ष सर्वांनाच ज्ञात आहे. विधानसभा निवडणुकीला आणखी बराच कालावधी असला तरी परळी मतदार संघात सत्ताधारी मंत्री व विरोधी पक्षनेते यांच्यात या न त्या कारणावरून शाब्दिक चकमकी सुरू आहेत. आरोप आणि प्रत्यारोपाची रणधुमाळी चांगलीच रंगल्याचे चित्र सध्या परळी मतदार संघात पाहावयास मिळत आहे. परळी पंचायत समितीच्या उद्घाटन कार्यक्रमावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी आदल्या दिवशी केलेल्या उद्घाटन नाट्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. तसेच प्रोटोकॉल तोडून उद्घाटन करणारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले.

विद्यार्थिनींना छेडत होता, रोड रोमिओला मुली, पालक आणि स्थानिकांनी मिळून धुतला

First published: July 13, 2019, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading