भाजपमध्ये भूकंप घडवणारी बातमी, पंकजा मुंडेंनी थेट फडणवीसांबद्दल केला मोठा गौप्यस्फोट!

भाजपमध्ये भूकंप घडवणारी बातमी, पंकजा मुंडेंनी थेट फडणवीसांबद्दल केला मोठा गौप्यस्फोट!

विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांसह अनेक आमदारांचे तिकीट कापले होते.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावरून राजकीय भूकंप घडवणार असे संकेत दिले होते. पण, त्याआधीच त्यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीटांचे वाटप करण्यात आले होते. पण, काही उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले होते. तिकीट न देण्याचा निर्णय हा दिल्लीत नसून महाराष्ट्रातच घेण्यात आला होता, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केला आहे.

तसंच विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांसह अनेक आमदारांचे तिकीट कापले होते. यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, बावनकुळे, प्रकाश मेहता या प्रमुख नेते आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपमधील नाराजी नाट्याच्या अंकाला मोठं वळण मिळलंआहे.

गोपीनाथ गडावर काय बोलणार पंकजा मुंडे?

दरम्यान, आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यातच गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त गुरूवारी गोपीनाथगडावर पंकजा मुंडे त्यांची ताकद दाखवून देणार आहेत. ताकद दाखवून देतानाच पंकजा मुंडे त्यांच्या समर्थकांसमोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कार्यक्रमाला भाजप आणि मित्र पक्षातील कोणते नेते उपस्थित राहणार ? यावरूनही चर्चा सुरू झाली. काही दिवसापूर्वी पंकजा यांनी पुढे काय करायचे ? कोणत्या मार्गाने जायचे ? आपली शक्ती काय ? आपण लोकांना काय देऊ शकतो? असे सांगत मावळ्यांनो या, अशी साद त्यांनी सोशल माडियातून घातली होती. त्यानंतर त्यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या.  त्यामुळे पंकजा मुंडे गुरूवारी काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असते तर कोणावरही अन्याय झाला नसता, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपमधल्या नाराज नेत्यांमधली नाराजी उफाळून आली. आता गुरूवारी पंकजा मुंडे काय तोफ डागणार त्यावरून राज्यातल्या पुढील राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 06:32 AM IST

ताज्या बातम्या