मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'26 जानेवारीपासून ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा करणार', पंकजा मुंडेंची घोषणा

'26 जानेवारीपासून ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा करणार', पंकजा मुंडेंची घोषणा

ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडे आक्रमक, ठाकरे सरकार अन् धनंजय मुंडेंवर साधला थेट निशाणा

ओबीसी आरक्षणावरुन पंकजा मुंडे आक्रमक, ठाकरे सरकार अन् धनंजय मुंडेंवर साधला थेट निशाणा

Pankaja Munde on OBC reservation: ओबीसी आरक्षणआच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. नववर्षात महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे.

बीड, 19 डिसेंबर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारवर (Mahavikas Aaghadi Government) टीका केली आहे. यासोबतच एक महत्त्वाची घोषणाही केली आहे. धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात 2 वर्षात एकदाही स्टेटमेंट दिले नाही. त्यानां ओबीसीच देणं घेणं नाही.? असा सवाल भाजपा नेत्यांना पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन 26 जानेवारीपासून मी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. (Pankaja Munde announce Maharashtra Tour for OBC and Maratha Reservation)

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाषण करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ही निवडणूक ओबीसीसाठी काळी निवडणूक आहे. ओबीसीचे आरक्षण गमावून महाविकास आघाडीचे नेते भाषण करतात. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होते.. हे दुर्दैव महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात फक्त तारखा दिल्या, काहीच केलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात.

मराठा समाजाला आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा आणि हार घालणार नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर भाजप आमदार सुरेश धस, माजी आ भीमराव धोंडे यांची उपस्थिती होती.

वाचा : 'राम तेरी गंगा मैली हो गयी' गुलाबराव पाटलांनी साधला खडसेंवर निशाणा

महाविकास आघाडी सरकार हे तीन पात्याच सरकार आहे. तुम्हाला विरोधी पक्षाची गरज नाही. एक पक्ष एक बोलतो तर दुसरा रस्त्यावर उतरण्याची भाषा बोलतात त्यांना जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.

बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 2 वर्षात जे नारळ फोडले ते देखील मी मंजूर केलेली कामे आहेत. तुमच्याकडे जास्त पैसे झाले असतील तर ओबीसी आरक्षणासाठी पैसे द्या... तुमचं राज्यत काही चालतं? मतदार संघात काही चालत नाही, हे किरायच मंत्री पद आहे असा घणाघात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केला आहे.

वाचा : अजितदादांचा असाही मोठेपणा, अमित शहांची एका मिनिटात केली पुण्यात मुक्कामाची व्यवस्था!

बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायत च्या निवडणुकांची रणधुमाळी

बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायत च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे यात प्रचार रंगात आला आहे. आष्टी,पाटोदा,शिरूर, वडवणी आणि केज या ठिकाणी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचा ताब्यातील असलेल्या आष्टी पाटोदा आणि शिरूर नगर पंचायतसाठी माजी मंत्री आमदार सुरेश धस तळ ठोकून आहेत तर केजमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत. काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटीलयांची प्रतिष्ठा पणाला लागली. सामाजिक न्याय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप फैरी झाडल्या जात आहेत. एकंदरीतच बीडमध्ये नगरपंचायतचे निवडणूक रंगात आली असून राजकीय वातावरण तापले आहे.

First published:

Tags: Dhananjay munde, Pankaja munde, Reservation