• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाल्या...

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाल्या...

'ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल, आमच्यावर मुंबईमध्ये 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका'

'ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल, आमच्यावर मुंबईमध्ये 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका'

'ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल, आमच्यावर मुंबईमध्ये 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका'

  • Share this:
    लातूर, 14 ऑगस्ट : ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी (OBC reservation) मला पंतप्रधान मोदींकडं, शरद पवारांकडं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडं जावं लागलं तरी मी जाईन किंवा समाजासाठी मला कमरेतून झुकून कोणी नमस्कार करा असं म्हटलं तरी मी तो करेन, पण आरक्षणासाठी काहीही' असं म्हणत ओबीसींच्या जागर मेळाव्यात पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी उपस्थितांची मन जिंकलं. तसंच, 'आमचा उद्रेक होऊ देऊ नका, मुंबई 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका', असा इशाराही पंकजांनी दिला. लातूर येथे ओबीसींच्या जागर मेळाव्याचे (obc jagar melava latur) आयोजन  विधान परिषद आमदार रमेश कराड यांनी केलं होतं. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंकजा मुंडे होत्या. यावेळी  पंकजा मुंडेंची ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून घणाघाती भाषण केलं. शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती 'ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल, आमच्यावर मुंबईमध्ये 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका. समाज शांत आहे. मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा कुणी प्रयत्न करू नये, आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाला त्यांचा हक्का हिरावून घेता कामा नये, मुंबईत १० लाख लोक बोलवू शकतो. आम्हाला चिंता नाही, तो एक दिवस येईल, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिली. 'ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय. IND vs ENG : विराट कोहलीचा तो निर्णय टीम इंडियासाठी ठरणार घोडचूक! तसंच, 'ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी मला पंतप्रधान मोदींकडं, शरद पवारांकडं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडं जावं लागलं तरी मी जाईन किंवा समाजासाठी मला कमरेतून झुकून कोणी नमस्कार करा असं म्हटलं तरी मी तो करेन, पण आरक्षणासाठी काहीही करण्याची तयारी आहे' असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.
    Published by:sachin Salve
    First published: