भोवळ आल्यानंतर पंकजा मुंडेंनी बहिणीकडे दिला 'हा' निरोप

भोवळ आल्यानंतर पंकजा मुंडेंनी बहिणीकडे दिला 'हा' निरोप

पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या बहीण आणि खासदार प्रितम मुंडे यांनी माहिती दिली आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, 19 ऑक्टोबर : भाजपच्या नेत्या आणि परळीतील उमेदवार पंकजा मुंडे यांना आपल्या प्रचाराच्या अखेरच्या सभेत भोवळ आली. भोवळ येऊन स्टेजवर कोसळलेल्या पंकजा मुंडे यांना नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या बहीण आणि खासदार प्रितम मुंडे यांनी माहिती दिली आहे.

'सोशल मीडियातील काही गोष्टींमुळे ताई अस्वस्थ आहेत. साधा आणि सरळ स्वभाव असल्याने तिला हे सगळं सहन होत नाही. हे लोक प्रचंड घाणेरडं वागत असल्यानं ताईंना ते सहन झालं नाही. काल रात्रीपासूनच त्या अस्वस्थ होत्या. ताईंनी सांगितलंय की आता सगळ तुमच्या हातात आहे,' अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रितम मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, परळीत शेवटची प्रचार सभा संपल्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भोवळ आली. पंकजा स्टेजवरच कोसळल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. पंकजा यांना उपचारासाठी तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पंकजा सकाळपासून उपाशीपोटी होत्या.

मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात शनिवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. प्रचाराचा शेवटच्या दिवस असल्याने पंकजा मुंडे यांनी दिवसभर सभा घेतल्या. मतदार संघात प्रवास केला. परळीच्या शेवटच्या सभेत पंकजांनी 45 मिनिटांचे भाषण ठोकले. भाषण संपताच पंकजांना भोवळ आली आणि त्या स्टेजवरच कोसळल्या. कार्यकर्ते आणि उपस्थित महिला नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. पंकजा यांना पाणी देण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी वेळीच सुरक्षारक्षक धावून आले.

पंकजा मुंडे यांच्या शनिवारी एकूण सात सभा होत्या. ही सभा त्यांची शेवटची सभा होती. पंकजा मागील 15 दिवसांपासून प्रचार कामात व्यस्त आहेत. दिवस-रात्र प्रवास आणि झोप कमी यामुळे पंकजा यांना भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखे नाही, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान,शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. परळी मतदार संघात पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात काट्याची लढत आहे.

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 08:34 PM IST

ताज्या बातम्या