'चांगले काम केले तर पाठीशी राहू आणि वाईट काम केले तर...', पंकजा मुंडेंनी दिला इशारा

'चांगले काम केले तर पाठीशी राहू आणि वाईट काम केले तर...', पंकजा मुंडेंनी दिला इशारा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

बीड, 21 फेब्रुवारी : 'सामन्यांच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले तर कौतुक करू. पण बीड जिल्ह्याची मान खाली जाईल असं काम कोणत्याही नेत्याने करू नये. कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करणे सरकारचे काम आहे,' असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'बीड जिल्हा पुन्हा गुंडागिरीकडे वळू लागला आहे. ही दुर्दैवी परिस्थिती आहे. मागच्या पाच वर्षात जिल्ह्याचं नाव फार मोठं झालं. मुलींची संख्या कमी होती ती वाढवली, विकासाची कामे केली, पीक विम्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. अशी प्रतिमा बनवलेली असताना पुन्हा जिल्हा गुंडगिरीकडे वळला आहे, अशी परिस्थिती आहे. 1995 ते 1999 च्या कालवधीत बीड जिल्ह्याला जे नको होते. स्व.मुंडे साहेबांना नापसंत होते. तेच पुन्हा होत आहे,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'गुंडगिरीचा सामान्य माणसाला त्रास होत आहे. यामध्ये राजकीय विरोध काहीच नाही. सरकार येतात जातात, नेते येतात जातात, पालकमंत्री येतात जातात. सामान्य लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. तो खपवून घेतला जाणार नाही,' असा इशारा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता दिला आहे. त्या बीड भाजपाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

'...तर रस्त्यावर उतरू'

'विरोधाला विरोध कधीच करत नाही. चांगले काम केले तर पाठीशी राहू, अन वाईट काम केले तर पाठीत धपाटा घालू. सरकारने खूप चांगले असे कोणतेच अद्याप काम केले नाही आणि अजून तरी खूप वाईट असे काम केले नाही. महाविकास आघाडीचे सरकार जुन्या सरकारच्या योजना बंद करण्यात बिझी आहे. अद्याप निर्णय घेत नाही. जर घेतलेला निर्णय आवडला नाही तर रस्त्यावर उतरू. मात्र युती सरकारने घेतलेले शिक्षकबदली, जनतेतून सरपंच निवड, हे सामन्या माणसाच्या हिताचे निर्णय रद्द करू नयेत,' अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: beed
First Published: Feb 21, 2020 05:51 PM IST

ताज्या बातम्या