मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंकजा मुंडेना मोठा धक्का!, समर्थक रमेश कराडांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पंकजा मुंडेना मोठा धक्का!, समर्थक रमेश कराडांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पंकजा मुंडेंचे समर्थक रमेश कराड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय.

02 मे : पंकजा मुंडेंचे समर्थक रमेश कराड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आहेत. दरम्यान,  उस्मानाबाद, लातूर, बीडच्या आमदारकीच्या निवडणुकांसाठी रमेश कराड हे उत्सुक होते. पण त्यांना पंकजा मुंडेंकडून कोणताही शब्द मिळाला नाही. याच मुद्द्याला लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी रमेश यांची आपल्या पक्षात घेऊन पंकजा यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. धनंजय मुंडेंकडून त्यांना आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारीही देण्यात आली आहे. राणा पाटील आणि सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. थोड्याच वेळात ते विधान परिषदेचा फॉर्म भरणार आहेत. कोण आहेत रमेश कराड? - दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक - लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले - कराड यांचं पंकजा यांच्याशिवाय भाजपमध्ये कोणाशीही संबंध नाही - लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच - पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ
First published:

Tags: Nationalist Congress Party, Pankaja munde, Ramesh Karad, पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, समर्थक रमेश कराड

पुढील बातम्या