मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला : पंकजा मुंडे

मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला : पंकजा मुंडे

'राजकीय कामांमुळे मला घरी वेळ देता येत नव्हता. मात्र आता वेळ देत असल्यामुळे मुलाला आनंद झाला,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

  • Share this:

बीड, 21 फेब्रुवारी : 'पाच वर्षे सत्तेत राहून माझा पराभव झाला. मात्र याचा आनंद सर्वात जास्त माझ्या मुलाला झाला आहे,' अशी प्रतिक्रिया आज पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. 'पाच वर्ष सत्तेनंतर आम्ही निवडणुकीला समोर गेलो. यात माझा पराभव झाला. राजकीय कामांमुळे मला घरी वेळ देता येत नव्हता. मात्र आता वेळ देत असल्यामुळे मुलाला आनंद झाला,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'पराभव झाल्यामुळे मी जास्त वेळ घरीच असते आणि म्हणून घरातल्या व्यक्तींना मी वेळ देऊ शकते. आता घरातल्या व्यक्तींसाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे माझ्या घरातील लोक आनंदी आहेत. याचा सर्वात जास्त आनंद माझा मुलगा आर्यमान अमित पालवे याला झाला,' असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

'पराभवाने खचून जाणे हे रक्तात नाही..'

पराभवाने खचून जाणे हे रक्तात नाही. सामान्य माणसासाठी मी राजकारण करते. बीड जिल्ह्यात कोट्यवधीचा निधी आणला. इथून पुढे दोन वर्ष मी आणलेल्या निधी तून कामे होतील. विकास, शांतता, रस्ते, पाणी देण्याचा प्रयत्न केला. सत्तेत असताना कुटुंबाला वेळ देता येत नव्हता. आता वेळ आहे म्हणून माझा मुलगा आर्यमान म्हणतो बंर झाल आई तू पडली. आम्हाला आता वेळ मिळेल म्हणून सर्वात जास्त आनंद त्याला झाला,' असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 08:59 PM IST

ताज्या बातम्या