माझ्या 'सही'त वजन, निधीसाठी दिल्लीत जाण्याची गरज नाही - पंकजा मुंडे

माझ्या 'सही'त वजन, निधीसाठी दिल्लीत जाण्याची गरज नाही - पंकजा मुंडे

गेवराई येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गातील येडशी ते औरंगाबाद या टप्प्यातील महामार्गाचं लोकार्पण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलं.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 09 मार्च : 'माझ्या 'सही'त वजन आहे. मला निधी आणण्यासाठी दिल्लीत जाण्याची गरज लागली नाही' असं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. गेवराई येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गातील येडशी ते औरंगाबाद या टप्प्यातील महामार्गाचं लोकार्पण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले. यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. 'राष्ट्रवादीच्या लोकांनी मराठवाडय़ात नुसतं राजकारण केलं. पश्चिम महाराष्ट्रात सगळं चांगलं आहे. पण राष्ट्रवादी मराठवाड्यातल्याचा नेत्यांचा का वापर करते' अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

'माझा बीड जिल्हा कोल्हापूर आणि सांगलीपेक्षा चांगला करायचा आहे. 40 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तो निधी आम्ही 4 वर्षात दिला. रस्ता ही पब्लिक प्रॉपर्टी झाली आहे. तुम्ही करोड पती झाला आहात' असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, 'रस्ते तुमचे आहेत ना मग तुम्ही करोडपती आहत. बीड जिल्ह्य़ाच्या भविष्याचा पाया मजबूत केला. रोजगार, व्यवसाय उद्योग दिले. या बीड जिल्ह्य़ाचा चेहरा मोहरा बदला आहे' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'ज्यांच्या दलाल्या बंद केल्या ते आज ओरडत आहेत.  आम्ही त्यांच्यासारख्यांचं  घर भरायचं काम केलं नाही. आम्ही गोर-गरिब लोकांना अन्नधान्य दिलं' असाही नारा यावेळी त्यांनी लगावला. बरं इतकंच नाही तर 'पुढचं सरकार आमचे येणार आहे' असा विश्वासही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला.

दरम्यान, 'गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लोकार्पण सोहळ्यासाठी गेवराई इथे येणार होते. परंतु, त्यांचा हा नियोजित दौरा स्थगित झाला. मराठवाड्याच्या रस्ते विकासासाठी 61 हजार कोटी दिले आहेत. नदी जोडप्रकल्प राबवून आगामी काळात "कमल गंगा प्रकल्प" या मधून ठाणे येथील पाणी गोदावरीमध्ये वळवून जायकवाडी धरणातील पाणीसाठा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल' असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पालकमंत्री पकंजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमजार लक्ष्मण पवार, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस,  संगीता ठोंबरे, आर.टी. देशमुख, भीमराव धोंडे, रमेश आडसकर, आदींची उपस्थिती होती.

सर्वोच्च न्यायालयाचा पंकजा मुंडे यांना दणका; 6 हजार 300 कोटी कंत्राट केले रद्द

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार आणि मंत्री पंकजा मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंडे मंत्री असलेल्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या 6 हजार 300 कोटी रुपयांचे आहार कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच याचा फाटका राज्य सरकारला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

महिला व बालविकास मंत्रालयाने अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठा करण्यासाठी 2016मध्ये हे कंत्राट दिले होते. हे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने 26 फ्रेब्रुवारी रोजी कंत्राट रद्द करण्याचा आदेश दिला होता.

मंत्रालयाकडून कंत्राट देताना महिला बचत गटांना डावलण्यात आले. काही मोठ्या उद्योजकांना फायदा मिळवून देण्यासाठी कंत्राटामध्ये तांत्रिक आणि आर्थिक अटी बदलण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कंत्रात देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राट रद्द करत चार आठवड्यात नवे कंत्राट काढण्याचे आदेश देखील देण्यात दिले आहेत. तसेच नव्याने काढण्यात येणाऱ्या कंत्राट महिला बचत गटांचा समावेश होईल याची काळजी घेण्यास न्यायालयाने बजावले आहे.

या बाबत वैष्णोराणी महिला बचत गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा निकाल देताना न्यायालयाने नवे कंत्राट जारी होईपर्यंत लहान मुले व महिलांसाठी पर्यायी मार्गाने पोषण आहाराची सोय करावी असे सांगितले आहे.

उंदराने चोरले कोट्यवधींचे हिरे, CCTV VIDEO व्हायरल

 

First published: March 9, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading