शालाबाह्य कामातून आता शालेय शिक्षकांची सुटका- पंकजा मुंडेंच आश्वासन

शालाबाह्य कामातून आता शालेय शिक्षकांची सुटका- पंकजा मुंडेंच आश्वासन

शिक्षकांना सध्या शौचालय सर्वेक्षण, निवडणूक आणि इतर शाळाबाह्य कामं करावी लागतात. ही कामं भविष्यात शिक्षकांना करावी लागणार नाहीत असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

04 जानेवारी:  शिक्षकांना शाळाबाह्य कामातून लवकरच मुक्त करणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलीय. सिंधुदुर्गातल्या सोळाव्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात त्या बोलत होत्या.

शिक्षकांना सध्या शौचालय सर्वेक्षण, निवडणूक आणि इतर शाळाबाह्य कामं करावी लागतात. ही कामं भविष्यात शिक्षकांना करावी लागणार नाहीत असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं  आहे.

तसंच आयसीएसई आणि सीबीएससी बोर्डाप्रमाणेच राज्यातल्या मराठी शाळांसाठी आंतरराष्ट्रीय स्कूल बोर्डाची निर्मिती केली जाणार असून यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातल्या शंभर शाळा निवडण्यात आल्याच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय . ग्रामीण भागातल्या हुशार मराठी विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणे आंतराष्ट्रीय ज्ञान मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच तावडे म्हणालेत . सिंधुदुर्गात झालेल्या प्राथमिक शिक्षक अधिवेशनात ते बोलत होते .

अधिवेशनाला सिंधुदुर्गात आलेला असाल तर परत जाताना जवळ असलेल्या गोव्याला जरूर जा पण चुकीच काही करु नका असा सल्ला शिक्षण मंत्री विनोद तावडे यानी शिक्षकांना दिलाय . तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गोव्यात जाणाऱ्या शिक्षकांनी आपल्या ड्रायव्हरला सावध ठेवण्यास सांगितलंय . यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी वर्गात मुलांवर चांगले संस्कार करण्याची  अपेक्षा असलेल्या शिक्षकांबाबत चांगलं ऐकू येत नसल्याचं सांगत शिक्षकांना उपदेशाचे डोसही पाजले   आहेत.

आता या निर्णयामुळे शालेय शिक्षकांचा इतर कामांचा फेरा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार  आहे.

 

First published: January 4, 2018, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading