मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत', वडिलांच्या जयंतीदिनी पंकजांचा भाऊ धनंजय मुंडेंवर निशाणा

'हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत', वडिलांच्या जयंतीदिनी पंकजांचा भाऊ धनंजय मुंडेंवर निशाणा

"आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का?", असे सवाल पंकजा मुंडे यांनी केले आहेत.

"आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का?", असे सवाल पंकजा मुंडे यांनी केले आहेत.

"आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का?", असे सवाल पंकजा मुंडे यांनी केले आहेत.

बीड, 12 डिसेंबर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आज जयंती आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचादेखील आज वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल ट्विटरवर भावनिक पोस्ट शेअर करत आदरांजली वाहिली. तसेच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. याच गोष्टीचा धागा पकडत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपले भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? असा सवाल पंकजा यांनी केला आहे.

पंकजा नेमकं काय म्हणाल्या?

"स्वतःचा वाढदिवस आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का? हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत", असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. "किती मोठ्या कमानी लावल्या, कितीही मोठ्या रांगोळ्या काढा, किती मोठे कटआउट लावले, जाहिराती दिल्या, त्यात गरिबाला काय मिळालं? याचा विचार करावा", असं पंकजा मुंडे म्हणाल्या. गोपीनाथ गडावर आयोजित लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती. हेही वाचा : 'नोकरी देऊ शकत नसाल तर किमान थट्टा तरी करु नका', देवेंद्र फडणवीस संतापले

'गोपीनाथ गड गावागावात घेऊन जाण्याचा संकल्प'

"आजचा दिवस हा समर्पित केलेला आहे. सेवा, योजनासाठी, सेवेचा संकल्प मी केला आहे. आतापर्यंत गोपीनाथ गडावर देशाचे-राज्याचे मान्यवर नेते येऊन गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील येऊन गेले. पक्षाचा कुठलाही भेदभाव गडावर नाही. दरवर्षी गोपीनाथ गडावर गरिबातील गरीब माणसं येतात. मात्र यावर्षी आम्ही गोपीनाथ गड गावागावात घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. गोपीनाथ गड शेतकऱ्यापर्यंत, वीट भट्टी, खडी फोडणाऱ्यापर्यंत घेऊन जाऊया. मी आज ऊसतोड कामगारांचा फडात जावून त्यांच्यासोबत ऊस कसे तोडतात? कसं कष्ट करतात, हे आज पाहणार आहे. स्वयंपाक तयार करुन घेतला आहे. त्यांच्यासोबत आम्ही जेवण करणार आहोत", असं पंकजा मुंडे म्हणाल्या. हेही वाचा : धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली; भावूक Tweet करत लिहिलं, ''अप्पा... काळीज जड होते''

'मुंडेंच्या जयंतीत शरद पवार सामील झाले असं वाटतंय'

"सन्माननीय शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यांनादेखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! गोपीनाथ मुंडेंच्या नगरीत शरद पवारांचे मोठमोठे बॅनर लागले. मुंडेंच्या जयंतीत शरद पवार सामील झाले असं वाटतंय", असं पंकजा मुंडे म्हणाल्या. "गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची प्रतारणा ज्यावेळेस पंकजा मुंडे करील त्यावेळेस या मंचावर तुम्ही मला उभं राहू देणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. मुंडेंच्या विचारांची प्रतारणा होईल असं काम मी कधीही करणार नाही. सत्तेच्या खुर्चीवर बसून पराभव पंचवला. विरोधी पक्षनेत्या बाकावर बसून पाहिलं. राज्यत-देशात फिरले. सगळ्यात मोठी श्रीमंती गोष्ट म्हणजे मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा आहे. याचा आनंद मला खूप मोठा आहे. मी आज ऊसतोड मजूराचे फडात लसीकरण मोहीम करणार आहे. भव्यता दाखवताना सामन्यात उतरले पाहिजे", असं पंकजा म्हणाल्या.
First published:

पुढील बातम्या