नाशिक, 01 नोव्हेंबर : नाशिकमध्ये (nashik) आज ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर आले. राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या जिल्ह्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी हजेरी लावली. यावेळी नाशिकच्या विकासकामावरून पंकजा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधाला.
नाशिकमध्ये (nashik) वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
'मी मुंडे साहेबांच्या फोटोकडे बघून म्हणते मी राजकारणात का आले, ज्यांना कशाचा अधिकार नव्हता. आशा लोकांचा आवाज बनायचं असं मला मुंडे साहेब सांगायचे. नुसतं भाषण करून काही होत नाही. आमच्या मराठवाड्यात दुष्काळच दुष्काळ आहे. जिथे विकास कमी तिथं राजकारण आणि राजकारणच आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेता टोला लगावला.
online गेमच्या व्यसनाने तरुणाचा घेतला जीव, 10 लाख गमावल्यानंतर केली आत्महत्या
तसंच, तुमच्या डोळ्याला दिसणारा विकास केला आहे, धार्मिक म्हणजे अंधश्रद्धाळू नको. मी उद्या नाशिकच्या बससेवेचा आनंद घेणार आहे. मी आमदार नाही त्यामुळे तिकीट काढून आनंद घेणार आहे. कारण नाशिकच्या बससेवेच कौतुक झालंय. नाशिकमध्ये अनेक चांगली विकास काम झाली आहे. महिला आमदारांचाही अधिक जोर आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांचं कौतुक केलं.
'पंतप्रधान मोदी यांनी इतके जोरदार आहेत की आता कोणी हलूच शकत नाही. आतापर्यंत असं वाटत होतं पंतप्रधानांच्या घरातच प्रधान मंत्री होतो. मात्र गरीब कुटुंबातील प्रधान मंत्री झाले, असंही पंकजा म्हणाल्या.
फॅन्सनी गुपचूप दुबईत बनवलेला दीपिका पादुकोणचा 'तो' VIDEO व्हायरल
'मुंडे साहेब म्हणायचे जावा त्याच्या अंशा तेव्हा कळे. जनता खूप हुशार आहे योग्य वेळी योग्य माणसाच्या मागे उभे राहते. नाशिकची जनता खूप हुशार आहे. मुंडे साहेबांचं नाशिकवर प्रेम आणि माझं ही प्रेम आहेच. साहेबांचं नाव दिल म्हणजे मी येणारच, आपली ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवून देऊ, असंही पंकजा म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.