मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...म्हणून मला मंत्रिपद मिळालं नसेल', कॅबिनेटमध्ये संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज?

'...म्हणून मला मंत्रिपद मिळालं नसेल', कॅबिनेटमध्ये संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज?

Pankaja Munde on Cabinet Minister

Pankaja Munde on Cabinet Minister

महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर 39 दिवसांनी 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला. मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

    बीड, 11 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर 39 दिवसांनी 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला. या विस्तारामध्ये भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण असं झालं नाही. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याबद्दल पंकजा मुंडेना विचारलं असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तुमचं नाव कायम चर्चेत असतं पण मंत्रिपद मिळत नाही, असा प्रश्न विचारला असता चर्चेत असण्यासारखंच नाव आहे ना, काय वाईट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 'तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोक असतील, जेव्हा माझी पात्रता वाढेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. मी जे काम करते ते स्वाभीमानाने करते आणि इज्जतीने राजकारण करते', असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे त्या मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान नसल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर टीका केली. पंकजा मुंडेंनी या टीकेलाही उत्तर दिलं. 'मंत्रिमंडळामध्ये महिला असली पाहिजे. महिला म्हणजे महिला बालकल्याण. मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक, आदिवासी म्हणजे आदिवासी विभाग, असं नाही पाहिजे. मागच्यावेळी मला महिला बालकल्याणसह ग्रामविकासही देण्यात आलं होतं, याचं कौतुक. महिलांना संधी दिली पाहिजे, पण महिला बालकल्याणच्या पलिकडे जाऊनही दिली पाहिजे', असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मंगळवारी राजभवनावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली नव्हती. पंकजा मुंडेंची ही अनुपस्थिती तेव्हाही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या