तुम्ही नाराज आहात का असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...!

तुम्ही नाराज आहात का असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंचं सूचक विधान, म्हणाल्या...!

नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : तुम्ही पक्षावर नाराज आहात का? असा प्रश्न विचारला असता यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचक व्यक्तव्य केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ झाल्याने बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यावर विचारलं असता इतक्या दिवस थांबला आता आणखी एक दिवस थांबा अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमात त्या व्यस्त आहेत. यावेळी उद्याचा कार्यक्रम हा राजकीय नाही. त्यामुळे ज्यांना आमंत्रण दिलं ते नक्की येतील असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, स्वत: पंकजा मुंडे यांनी याबाबत खुलासा केला होता. गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी व्यस्त असल्यानं बैठकीला येऊ शकणार नाही, असा निरोप पंकजा मुंडे यांनी पक्षाला पाठवल्याची माहिती आहे.

इतर बातम्या - क्रूरतेचा कळस! बुलडाण्यात 16 वर्षीय गतिमंद मुलीवर दोघांनी केला बलात्कार

गोपीनाथ गडावरील मेळाव्याची जय्यत तयारी सुरू

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 12 डिसेंबरला 12 वाजता मेळाव्यास सुरुवात होणार असून विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेतील यावर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

इतर बातम्या - लेकीची पाठवणी करण्याआधी बापाचाच संसार उद्ध्वस्त, आयुष्याची जमापुंजी जळून खाक!

पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का? याबाबतीत तर्क वितर्क लावले जात आहेत. या कार्यक्रमात राज्यातील सर्वच मुंडे समर्थकांना 12 तारखेला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्याच दिवशी स्वाभिमान दिवस म्हणून गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे या त्यांच्या समर्थकांसमोर निर्णय घेणार आहेत.

इतर बातम्या - भाजपमध्ये पडणार मोठी फूट? 24 तासांत चित्र होणार स्पष्ट

Published by: Renuka Dhaybar
First published: December 11, 2019, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading