मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जाहीर सभेत पंकजा मुंडेंकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक अन् कार्यकर्त्यांना दिला 'हा' सल्ला

जाहीर सभेत पंकजा मुंडेंकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक अन् कार्यकर्त्यांना दिला 'हा' सल्ला

Pankaja Munde praised devendra fadnavis : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या रणधुमाळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांचं कौकुत केलं आहे.

Pankaja Munde praised devendra fadnavis : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या रणधुमाळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांचं कौकुत केलं आहे.

Pankaja Munde praised devendra fadnavis : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या रणधुमाळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांचं कौकुत केलं आहे.

बीड, 19 डिसेंबर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील राजकीय वाद - संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आता एका जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी चक्क देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. बीड जिल्ह्यातील (Beed district) आष्टीमध्ये एका प्रसार सभेत भाषण करताना पंकजा मुंडे यांनी फडणवसांचं कौतुक केलं आणि त्यासोबतच फडणवीसांकडून संयम शिकण्याचा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स ही शिकण्याची गोष्ट आहे. सुरेश धस आणि भीमराव धोंडे दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे 50-50 टक्के जागा मागितल्या. त्यांनी ते ऐकून घेतलं. ते नेमहीच ऐकून घेतात, त्यांच्याकडून ऐकण्यासारखं आहे ते म्हणजे पेशन्स. मी ही त्यांच्याकडून पेशन्स शिकले आहे.

वाचा : 'राम तेरी गंगा मैली हो गयी' गुलाबराव पाटलांनी साधला खडसेंवर निशाणा

जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्याने दोघांमधील राजकीय संघर्ष आता कमी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारताना सुद्धा दिसून आले.

26 जानेवारीपासून महाराष्ट्राचा दौरा

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन 26 जानेवारीपासून मी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, ही निवडणूक ओबीसीसाठी काळी निवडणूक आहे. ओबीसीचे आरक्षण गमावून महाविकास आघाडीचे नेते भाषण करतात. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होते.. हे दुर्दैव महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात फक्त तारखा दिल्या, काहीच केलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात.

बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 2 वर्षात जे नारळ फोडले ते देखील मी मंजूर केलेली कामे आहेत. तुमच्याकडे जास्त पैसे झाले असतील तर ओबीसी आरक्षणासाठी पैसे द्या... तुमचं राज्यत काही चालतं? मतदार संघात काही चालत नाही, हे किरायच मंत्री पद आहे असा घणाघात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर केला आहे.

बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायत च्या निवडणुकांची रणधुमाळी

बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायत च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे यात प्रचार रंगात आला आहे. आष्टी,पाटोदा,शिरूर, वडवणी आणि केज या ठिकाणी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचा ताब्यातील असलेल्या आष्टी पाटोदा आणि शिरूर नगर पंचायतसाठी माजी मंत्री आमदार सुरेश धस तळ ठोकून आहेत तर केजमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत.

First published:
top videos

    Tags: Beed, Devendra Fadnavis, Pankaja munde