VIDEO : युतीत आम्ही विरोधकांना भांडायला जागाच देत नाहीत - पंकजा मुंडे

VIDEO : युतीत आम्ही विरोधकांना भांडायला जागाच देत नाहीत - पंकजा मुंडे

'ज्या बारामतीकरांना स्वतः च्या मतदारसंघात फक्त दोनच जागा मिळतात. ते दुसऱ्यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत आहे'

  • Share this:

सुरेश जाधव,प्रतिनिधी

बीड, 17 जानेवारी : 'सरकारमध्ये आम्ही दोघेही असतो, मात्र आम्ही विरोधकांना भांडायला जागाच देत नाही. त्यामुळे विरोधकांचं साधं एक स्टेटमेंट सुद्धा येत नाहीत, असं वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील विकास कामाच्या भूमीपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.

आष्टी तालुक्यातील कडा इथं रस्ते भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी त्यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी युती संदर्भात हे वक्तव्य केलं आहे.

तसंच पंकजा मुंडेंनी बारामतीकरांवरही तोफ डागली. 'ज्या बारामतीकरांना स्वतः च्या मतदारसंघात फक्त दोनच जागा मिळतात. ते दुसऱ्यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत आहे, त्यांनी बीडच्या विकासात काय दिले.' अशी टीका त्यांनी केली.

'2019 च्या निवडणुकीत मी निवडून येईल, ग्रामविकास मंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून पुन्हा सत्तेवर येणारच आहे, असा विश्वासही पंकजा मुंडे बोलून दाखवला.

======================================

First published: January 17, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading