पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टवरून पुन्हा नव्या चर्चा

पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टवरून पुन्हा नव्या चर्चा

वास्तविक पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही याच टेम्पलेटवर अनेक फेसबुक पोस्ट केल्या होत्या. पण पंकजा मुंडे भाजप सोडून जाणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट शेअर झाल्याने आणखी चर्चा वाढल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : पंकजा मुंडे यांनी त्यांच्या Twitter अकाउंटवरून भारतीय जनता पक्षाचं नाव हटवलं आणि त्या पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्ष सोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात होतं. त्या शिवसेनेत जाणार, अशीही चर्चा सुरू आहे. भाजप नेत्यांनी या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पंकजा मुंडे पक्ष सोडून जाणार नाहीत, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला होता. पण त्याच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नेते विनोद तावडे पंकजा मुंडे यांची मनधरणी करत आहेत, अशीही बातमी आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या फेसबुक पोस्टने नव्या शंका आणि चर्चांना खाद्य दिलं. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याच्या हेतूने पंकजा यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यावर त्यांच्या नावाशेजारी कमळ असल्याचं लक्षात येतं.

वास्तविक पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही याच टेम्पलेटवर अनेक फेसबुक पोस्ट केल्या होत्या. त्यांच्या या पोस्टमध्ये असलेलं कमळ नव्याने आलेलं किंवा काढून टाकलेलं नाही. त्यांच्या फेसबुक अकाउंटवर अजूनही अबाउट सेक्शनमध्ये त्यांचा राजकीय संबंध भाजपशी असल्याचं लिहिलेलं आहे.

संबंधित - पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेबद्दल नीलम गोऱ्हेंनी केलं सूचक वक्तव्य

राजेंद्र प्रसाद यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन अशा अर्थाची पोस्ट पंकजा मुंडे यांनी मंगळवारी केली.

तत्पूर्वी आपल्या समर्थकांना उद्देशून एक भावनिक फेसबुक पोस्ट केली. त्यानंतर या चर्चेला उधाण आलं. राज्यातील सत्तासंघर्षात तोंड पोळालेल्या भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीनंतर पंकडा मुंडे यांनी  स्वत:ला राजकीय चर्चेपासून अलिप्त ठेवलं होतं. मात्र, आता गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला त्या आपल्या समर्थकांशी  संवाद साधणार आहेत. त्याविषयी त्यांनी  फेसबूकवरून एक भावनिक पोस्ट लिहिली.

हेही वाचा - PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!

या फेसबुक पोस्टपाठोपाठ त्यांच्या  ट्विटर हँडलवरून भाजप नेत्या हा उल्लेखही  गायब झाला आणि पंकजा यांच्याविषयीची बातमी खरी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

---------------------------

SPECIAL REPORT: भाजपची साथ सोडून हाती घेणार 'धनुष्यबाण'? काय आहे पंकजा मुंडेंच्या मनात?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या