मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान

कर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान


औरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.

औरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.

औरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 16 जानेवारी : कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या 'आॅपरेशन लोटस'वर सुचक विधान केलं आहे. लवकरच कर्नाटकमध्ये आपली सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

औरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. लोकसभा शक्ती केंद्र गटाचे कार्यकर्ते या मार्गदर्शन मेळाव्याला हजार होते. यावेळी, 'कर्नाटकमध्ये आपलं सरकार येऊ शकतं, गमावलेली राज्य पुन्हा आपल्या हातात येऊ शकतात', असा दावा पंकजा मुंडेंनी केला आहे.

तसंच 'औरंगाबादेत 3 मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्वच नाही. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा नाही', असं सांगून पंकजा यांनी अप्रत्यक्षरित्या आपला सामना हा सेनेसोबत असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे तीन नाराज आमदार भाजपसोबत आहे. भाजप नेत्यांच्या मते सर्व काही व्यवस्थित झालं तर मकर उद्या गुरुवारी 17 तारखेला कर्नाटकात नवं सरकार बनू शकते.

कर्नाटकमधल्या एका भाजपच्या वरिष्ठ आमदारांनी सांगितलं की, 'आमच्या हायकमांडला वाटतं लोकसभेची निवडणूक काँग्रेस-जेडीएस यांनी एकत्र होऊन लढवली, तर भाजपसाठी कठीण जाईल. कर्नाटकात जास्तीत जास्त जागा जिंकणं गरजेचं आहे. हे जेव्हा शक्य होईल, तेव्हा तिथे आपलं सरकार असेल. एकदा का जेडीएस बाहेर पडला तर त्याला एकट्यानं निवडणूक लढवावी लागेल किंवा एनडीएमध्ये सामील व्हावं लागेल. त्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास संपेल. म्हणूनच आमचे नेते सत्तापालट करण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहेत.'

======================

First published:

Tags: BJP, Karnataka, Pankaja munde, पंकजा मुंडे