मी पक्षात राहून संघर्ष करणार; पंकजांनी दिला 26 जानेवारीचा 'लक्ष्यवेधी' इशारा; गोपिनाथगडावरच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे

मी पक्षात राहून संघर्ष करणार; पंकजांनी दिला 26 जानेवारीचा 'लक्ष्यवेधी' इशारा; गोपिनाथगडावरच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे

"मी बंड करणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या, ते शोधून काढावं", असं पक्षाला सांगत पंकजांनी सध्या तरी पक्ष सोडण्याच्या चर्चेला विराम दिला आहे. पण 26 जानेवारीला आपण मुंबईत एक नवं कार्यालय सुरू करणार असंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या भाषणातले प्रमुख मुद्दे.

  • Share this:

परळी, 12 जानेवारी : दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर मोठी सभा घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या सभेला उपस्थित होते. त्यांच्यासमोरच एकनाथ खडसे यांनी मन मोकळं करत फडणवीसांवर नाव न घेता आरोप केले. नंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या पंकजा म्हणाल्या, मन मोकळं केलं नाही, तर विष बनतं. आपण पक्ष सोडून जाणार नाही, हे स्पष्ट करताना पंकजा यांनी एक मोठा इशाराही दिला. बॉल भाजपच्या कोर्टात आहे, असं सांगताना म्हणाल्या, "मी बंड करणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या, ते शोधून काढावं."

भाजप सोडणार नाही, असं सांगत असतानाच त्यांनी 26 जानेवारीला गोपिनाथ प्रतिष्ठानचं कार्यालय मुंबईत सुरू करणार असल्याची घोषणा केली. मी मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार, असं पंकजा म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे :

-मी संघर्ष करणार, काम करणार.

-माझ्या लोकांनी घाबरू नये.

-26 जानेवारीला मुंबईत कार्यालय सुरू करणार.

-27 जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार

-केवळ लक्ष्य वेधण्यासाठी उपोषण करणार

-2014 भाजपचा मुख्यमंत्री करण्यास योगदान दिलं

-कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त कराण्याची मागणी

-मी पक्ष सोडणार नाही, मी वज्रमूठ करणार

-सत्ता असताना बंधनं होती, अता मी मुक्त

-मी आधी परळीची होते आता राज्याची आहे

-आता पक्षानं जे करायचं ते करावं

-मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही

-आता भाजपच्या कोर्टात बॉल

-पंकजा मुंडे बेईमान होणार नाही

-आपला हक्क आपल्याला घ्यायचा आहे

-पक्ष स्थापायचा की नाही ते पुढे ठरवू

-पुढे काय करायचं ते बघू

-मीच अल्पसंख्याक आहे सध्या

-एका महिलेनं राज्याचं नेतृत्व कऱण्याची अपेक्षा ठेवली तर त्यात चूक काय

-मला मुख्यमंत्री व्हायचयं असं म्हटलं तर त्यात काय चुकीचं

-मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार

-मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा

-तुम्ही मला जे समजता तीच माझी ताकद

-राज्यभरातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

-मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सुरु करणार

-कार्यकर्त्यांनो हरायचं नाही, मी बंडखोर नेता आहे

-बंडखोर विचाराच्याच नेत्यांचीच गरज आहे

-बंड केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालं नसतं

-बंड करणारच, स्वाभिमान दिवस आहे, आता मी काम करणार

-हा माझ्या बापाचा पक्ष आहे, हा माझा पक्ष आहे

-बेईमानी आमच्या रक्तात नाही

-आम्ही आमचे आहोत

-सुप्रिया सुळेंचे अश्रू मला माझ्या अश्रूंसारखे वाटले

-आम्ही चुकीचा विचार करत नाही

-भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्ती मागत आहे

-आपण पक्ष रिव्हर्स गीअरमध्ये नेऊ नये, पक्ष हा एका व्यक्तीचा नाही

-मला कोणत्या पक्षाची अपेक्षा नाही

-मी पक्ष सोडावं अशी कुणाची अपेक्षा आहे

-मी बंड करणार ही पुडी कुणी सोडली

-माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचं संस्कार

-माझी अपेक्षा कुणाकडून नाही

-मी का बंड करु

-शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचा एकएकआमदार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत होते

-गोपीनाथ मुंडेंनी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही

-गोपीनाथ मुंडेंच रक्त अळणी नाही

-फाटक्या लोकांनी माझी संघर्षयात्रा काढली

-काही लोक पंकजा मुंडेंविषयी चुकीचं बोलण्यासाठीच नेमले होते

-संजय राऊत यांनी जे बोललं ते करुन दाखवलं

-मन मोकळं केलं नाही की विष बनतं

 

First published: December 12, 2019, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading