पंकजा मुंडे बॅक इन अ‍ॅक्शन, 'या' निवडणुकीकडे वळवला मोर्चा!

पंकजा मुंडे बॅक इन अ‍ॅक्शन, 'या' निवडणुकीकडे वळवला मोर्चा!

आता राज्यात सत्ता बदलानंतर बीडच्या जिल्हा परिषदेत शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 17 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आता नव्या जोमाने कामाला लागल्या आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांनी कंबर कसली आहे.

पंकजा मुंडे यांनी आज जिल्हा परिषदेच्या सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीला 29 सदस्य उपस्थितीत होते. जिल्ह्या परिषद निवडणुकीत काय रणनीती आखायची याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय.  "राज्यात समीकरण वेगळं असलं तरी बीड मध्ये बदल होणार नाही. जिल्हा परिषद माझ्याच ताब्यात राहणार", असा विश्वास पंकजा यांनी बोलून दाखवला.

भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, शिवसंग्राम,यांच्या पाठिंब्यावर जिल्हा अडीच वर्ष भाजपाकडे सत्ता होती. मात्र, आता राज्यात सत्ता बदलानंतर बीडच्या जिल्हा परिषदेत शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर आज पंकजा मुंडे यांनी सर्वांना एकत्रित करून बैठक घेतली.

जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण

भाजपा-18 सदस्य

शिवसेना-4 सदस्य

शिवसंग्राम मधून भाजपमध्ये आलेले -4 सदस्य

कॉंग्रेस -2 सदस्य

तर राष्ट्रवादीगटातील नमिता मुंदडांसोबत भाजपमध्ये आलेला -1 सदस्य असे-29 सदस्य आहेत

सत्ता स्थापनेसाठी 27 सदस्याची गरज

विशेष म्हणजे,  या बैठकीपूर्वी महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांच्यासोबत पंकजा यांनी बंद दाराआड चर्चा केली. विठ्ठल महाराज हे गहिनीनाथ गडाचे महंत आहेत.

दरम्यान, 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळावा घेतला होता. यावेळी, 'पक्ष माझ्या बापाचा आहे, असं मी का म्हणू नये. मी बंडखोरी का करू? मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली खदखद व्यक्त केली होती.

तसंच 'माझ्यावर पदासासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली होती.

त्याचबरोबर 'मी लवकरच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा उद्धाटन करणार आहे. मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार,' अशी घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली होती. तसंच आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील प्रश्नांसाठी आपण संघर्ष करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं.

First Published: Dec 17, 2019 05:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading