• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सलग तिसऱ्या दिवशी राजीनामा सत्र सुरू; पंकजा मुंडे दिल्लीत मोदींच्या भेटीला, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?

सलग तिसऱ्या दिवशी राजीनामा सत्र सुरू; पंकजा मुंडे दिल्लीत मोदींच्या भेटीला, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?

Resignation of Munde supporters BJP activist: भाजपमध्ये सुरू असलेलं राजीनाम्यांचं सत्र सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

  • Share this:
बीड, 11 जुलै : खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Union Cabinet Expansion) स्थान दिले नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांसह, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांकडून राजीनामा सत्र (Resignation of Munde supporters) सुरू झालं आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर या राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे. काल एकाच दिवशी तब्बल 47 राजीनामे देण्यात आले होते. तर आज तिसऱ्या दिवशी देखील हे राजीनामासत्र सुरू आहे. आत्तापर्यंत तब्बल 77 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आज केज पंचायत समिती सभापती परीमला विश्वनाथ घुले यांच्यासह पंचायत समिती सदस्य सुलाबाई सदाशिव सरवदे, अनिता भगवान केदार आणि तानाजी पांडुरंग जोगदंड यांनी देखील राजीनामे दिले आहेत. तर पाटोदा पंचायत समिती सभापती सुवर्णा काकासाहेब लांबुड, शिरूर उप सभापती जालिंदर सानप, शँकर देशमुख, देविदास नागरगोजे यांनी राजीनामे दिले आहेत. सेना-भाजपचे नेते एकाच व्यासपीठावर; शिवसेना - भाजपची युती होणार? नितेश राणेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजीनामा सत्रानंतर, आज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दिल्लीला गेल्या आहेत. त्या ठिकाणी त्या जे.पी.नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली असून पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. आता यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संतोष हांगे, सारिका राणा डोईफोडे, रामराव खेडकर या जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा डोईफोडे यांनी काल राजीनामा दिला होता. या राजीनामा सत्रांमुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्हा पदाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी आहे. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे समर्थकांमध्ये संतापची लाट आहे.
Published by:Sunil Desale
First published: