मुंबई, 11 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांची बहीण पंकजा मुंडे रुग्णालयात गेल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीज कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परळीमध्ये झालेल्या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांची सातवी आणि आठवी बरगडी फ्रॅक्चर झाली होती.
4 जानेवारीला परळीमध्ये रात्री 12.30 च्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातानंतर धनंजय मुंडेंना परळीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण नंतर पुढच्या उपचारांसाठी मुंडेंना विमानाने मुंबईला आणण्यात आलं.
धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा मुंडे पोहोचल्या रुग्णालयात#DhananjayMunde #PankajaMunde pic.twitter.com/SpmD9VDuwW
— News18Lokmat (@News18lokmat) January 11, 2023
या अपघातानंतर धनंजय मुंडे यांची छाती आणि बरगड्यांना दुखापत झाली. धनंजय मुंडे यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस केली. मी डॉक्टरांना सांगितलं आहे, त्यांना जेवढे दिवस रुग्णालयात ठेवायचं आहे तेवढे दिवस ठेवा, पण कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं अजित पवार यांनी सांगितलं. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती.
नात्यात दुरावा
धनंजय मुंडे यांनी नात्यात दुरावा आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर 2014 साली पंकजा मुंडे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला, पण 2019 साली धनंजय मुंडे जाएंट किलर ठरले. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhananjay munde, Pankaja munde