देवेंद्र फडणवीसांसाठी पंकजा मुंडेंनी दौऱ्यात केला बदल, महत्त्वाच्या सूचनाही दिल्या

देवेंद्र फडणवीसांसाठी पंकजा मुंडेंनी दौऱ्यात केला बदल, महत्त्वाच्या सूचनाही दिल्या

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील पाहणी दौऱ्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात परिस्थिती जाणून घेत आहेत. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील पाहणी दौऱ्याची घोषणा केली आहे. मात्र या दौऱ्यात त्यांनी बदल केल्याचंही पाहायला मिळालं.

'माझा नांदेड-हिंगोली-परभणी-बीड असा अतिवृष्टी पाहणी दौरा ठरवला होता, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचाही मराठवाड्यात दौरा असल्याने मी 20 तारखेला नांदेड जिल्ह्याचा दौरा संपवून त्यांना जॉईन होईन,' अशी माहिती पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

'20 आणि 21 ऑक्टोबर यादिवशी मराठवाड्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा करून 22 तारखेला सकाळी औरंगाबाद येथून शहागड, गेवराई, बीड, वडवणी, तेलगाव, सिरसाळा मार्गे गोपीनाथ गड दर्शन व परळी निवासस्थानी मुक्कामासाठी येईल,' असं पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

1. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी भेटावे.

2. सर्वांनी मास्क घालून यावे तसेच सोशल डिस्टन्स राखावे.

3. सर्दी,खोकला, ताप असल्यास दौऱ्यात सहभागी होऊ नये.

तुमची काळजी मला आहे म्हणून हे नियम माझ्यासाठी तुम्ही पाळा, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उद्या 19 ऑक्टोबर पासून ते 22 ऑक्टोबर पर्यंत चार दिवस पुणे, सोलपूर सांगली व सातारा जिल्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा अतिवृष्टीचा दौरा करणार आहेत. यामध्ये 19 ऑक्टोबर रोजीच्या पुणे, बारामती इथं पाहणी करतील. जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये विरोधी पक्ष नेते दरेकर हे फडणवीस यांच्यासोबत उपस्थित असतील.

Published by: Akshay Shitole
First published: October 18, 2020, 11:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading