मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आपलंच सरकार' तरी पंकजा मुंडेंची फाईल धूळ खात, गृहखात्याचा 'थंड' रिसपॉन्स!

'आपलंच सरकार' तरी पंकजा मुंडेंची फाईल धूळ खात, गृहखात्याचा 'थंड' रिसपॉन्स!

भाजप नेत्या पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे

पंकजा मुंडे भाजपमधल्या (Pankaja Munde BJP) मोठ्या नेत्या आहेत. पंकजा यांना पक्षाने मध्य प्रदेशचं (Madhya Pradesh) सहप्रभारी केलं आहे.

  • Published by:  Shreyas
मनोज राठौड, भोपाळ, 16 ऑगस्ट : पंकजा मुंडे भाजपमधल्या (Pankaja Munde BJP) मोठ्या नेत्या आहेत. पंकजा यांना पक्षाने मध्य प्रदेशचं (Madhya Pradesh) सहप्रभारी केलं आहे, पण इच्छा असूनही त्यांना मध्य प्रदेशच्या आपल्या आवडत्या डीएसपीला मनाप्रमाणे पोस्टिंग देता येत नाहीये. पंकजा मुंडेंनी दिलेलं शिफारसीचं पत्र गृहविभागाच्या फाईलींमध्ये धूळ खात पडलं आहे. पंकजा मुंडे यांनी मागच्या वर्षी 29 ऑक्टोबरला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना पत्र लिहिलं. शाजापूरच्या डीएसपींना मंदसौर जिल्ह्याच्या गरोठ किंवा नीमच जिल्ह्याच्या जावदमध्ये एसडीओपी म्हणून नियुक्त करावं, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी शिवराज सिंग चौहान यांच्याकडे या पत्रातून केली. पंकजा मुंडे यांनी दिलेल्या शिफारस पत्राची फाईल मार्च महिन्यापर्यंत अधिकाऱ्यांच्या टेबलांवर फिरत होती, पण मार्च महिन्यानंतर अचानक ही फाईल धूळ खात पडली आहे. मुख्य म्हणजे डीएसपींनी स्वत:देखील गृह विभागाला पत्र लिहून पंकजा मुंडे यांनी केलेल्या शिफारसीची आठवण करून दिली, पण सरकारने त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं. मंत्रिपद नाही दरम्यान महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल का? याबाबत चर्चा सुरू होत्या, पण त्यांच्या पदरी निराशा आली. मंत्रिपद न मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्या नाराज आहेत का? असा प्रश्नही उपस्थित झाला. तुमचं नाव कायम चर्चेत असतं पण मंत्रिपद मिळत नाही, असा प्रश्न विचारला असता चर्चेत असण्यासारखंच नाव आहे ना, काय वाईट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 'तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेची लोक असतील, जेव्हा माझी पात्रता वाढेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. मी जे काम करते ते स्वाभीमानाने करते आणि इज्जतीने राजकारण करते', असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.
First published:

Tags: BJP, Pankaja munde

पुढील बातम्या