‘पंकजा मुंडे चांगलं काम करत आहेत’ शरद पवारांच्या कौतुकामुळे पुन्हा राजकीय चर्चेला उधाण

‘पंकजा मुंडे चांगलं काम करत आहेत’ शरद पवारांच्या कौतुकामुळे पुन्हा राजकीय चर्चेला उधाण

पंकजा मुंडे यांची नाराजी अजुनही गेली नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी केलेली पवारांची स्तुती आणि नंतर पवारांनी केलेलं कौतुक हे लक्षवेधी ठरलं आहे.

  • Share this:

नाशिक 28 ऑक्टोबर: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं कौतुक करून 24 तास होत नाहीत तोच पवारांनीही पंकजा मुंडे यांचं कौतुक (Sharad Pawar praised Pankaja Munde) केलं आहे. पंकजा या चांगलं काम करत आहेत असं पवारांनी नाशिक मध्ये म्हटलं आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे. पवारांच्या या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपमधून एकनाथ खडसे नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेलेत. खडसे हे भाजपमध्ये नाराज होते. विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे याही नाराज होत्या. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.

मंगळवारी पंकजा मुंडे या ऊसतोडणी कामगारांच्या बैठकीला उपस्थित होत्या. त्या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. त्यानंतर रात्री उशीरा पंकजा मुंडे यांनी ट्विट करत पवारांचं कौतुक केलं होतं. या वयातही पवार ज्या झपाट्याने काम करता हे कौतुकास्पद आहे असं पंकजाताईंनी म्हटलं होतं.

त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांचं कौतुक करत महाराष्ट्राची संस्कृतीच असल्याचं म्हटलं होतं. दोन्ही नेत्यांच्या या कौतुक वर्षावामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांची नाराजी अजुनही गेली नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी केलेली पवारांची स्तुती आणि नंतर पवारांनी केलेलं कौतुक हे लक्षवेधी ठरलं आहे.

शरद पवारांच राज्यपालांना खरमरीत पत्र, पुन्हा सुनावले खडे बोल

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केलेलं भाषण हेही आक्रमक होतं. या पार्श्वभूमीवर या सगळ्या राजकारणाकडे पाहिलं जात आहे.

पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यामध्येही रंगल्या होत्या गप्पा

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांचं राजकीय सख्य सगळ्यांनाच माहित आहे. अनेक दिवसानंतर हे दोनही नेते मंगळवारी पुण्यात एकाच कार्यक्रमात सोबत होत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात मंगळवारी बैठक झाली होती. त्या बैठकीत पंकजा आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. त्या दोघांचीही बसण्याची व्यवस्था ही शेजारीच केलेली होती आणि त्यांच्यात गप्पाही रंगल्या होत्या. त्यामुळे बैठक संपल्यानंतर त्यांना धनंजय मुंडे यांच्यासोबतचे मतभेद मिटले का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी थेट उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली.

आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा घोटाळा, फडणवीसांनी पत्र लिहून केले गंभीर आरोप

समाजाच्या हिताच्या प्रश्नावर आम्ही दोघे एकत्र आलो तर यात वावगं काहीच नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले तर आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून काही चांगलं होण्याचा प्रश्न नाही तर आमच्या पक्षाचा प्रॉब्लेम होईल असं मिश्किल उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं.

बीड जिल्ह्यातल्या राजकारणात दोघांमध्येही जोरदार वर्चस्वाची लढाई आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत दोनही नेत्यांच्या गप्पा रंगल्याने पत्रकारांमध्येही त्याची चर्चा होती. या गप्पांचा राजकीय अर्थ काढू नका असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 28, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या