मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनंजय मुंडे प्रकरणावर अखेर पंकजांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाल्या....

धनंजय मुंडे प्रकरणावर अखेर पंकजांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाल्या....

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी बोलण्याचे टाळले होते.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी बोलण्याचे टाळले होते.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी बोलण्याचे टाळले होते.

  • Published by:  sachin Salve
औरंगाबाद, 25 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर झालेल्या बलात्काराचा आरोप पीडितेने मागे घेतला आहे. अखेर या प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्या बहिण आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी बोलण्याचे टाळले होते. आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत असताना पंकजा यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. बारामतीतील अंगावर शहारे आणणारी घटना, अपघाताचा धक्कादायक VIDEO 'हा विषय आता मागे पडला आहे. पण हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. ते प्रकरण तेवढ्याच सैद्धांतिकदृष्या आणि संवेदनशीलता दाखवून हाताळले जाणे गरजेचे आहे, ज्या काही गोष्टी आहे, त्याचा भविष्यात निकाल लागेल, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मनसेला मोठा धक्का, पक्षातंर्गत वादामुळे एकाच वेळी 320 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तसंच, 'राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला तर त्यामध्ये त्याच्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी बाल कल्याण मंत्रीही राहिलेली आहे. त्यामुळे या विषयाकडे मी संवेदनशीलतेनं बघते. या विषय कुणाच जरी असता तरी मी त्याचे राजकीय भांडवल केले नसतं आणि आताही करणार नाही, असंही पंकजा यांनी स्पष्टपणे सांगितले. काय आहे प्रकरण? धनंजय मुंडे यांच्यावर रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिकेनं बलात्काराचा आरोप केला होता. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदुरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. तरुणीने तक्रार घेतली मागे रेणू शर्माने तक्रार दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. पण,  तक्रारदार महिलेने यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली.  पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार,  “मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
First published:

Tags: धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

पुढील बातम्या