सरकारविरोधातील रणांगणासाठी पंकजा मुंडे अंगणात उतरल्याच नाहीत, राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

सरकारविरोधातील रणांगणासाठी पंकजा मुंडे अंगणात उतरल्याच नाहीत, राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी देत कोरोनाच्या महामारीमध्ये सरकार अपयशी झाल्याची टीका केली.

  • Share this:

बीड, 22 मे : महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने 'माझे अंगण माझे रणांगण' या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बीड जिल्ह्यातही विविध ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी देत कोरोनाच्या महामारीमध्ये सरकार अपयशी झाल्याची टीका केली. मात्र राज्यात होत असलेल्या या आंदोलनामध्ये भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या दिसून आल्या नाही.

विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या या आंदोलनामध्ये परळीमध्ये मात्र कुठल्याही कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं नाह. यामुळे पंकजा मुंडेंनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली नाही का, अशी चर्चा होत आहे.

भाजपमधील सर्व नेत्यांनी आज घरातून ठाकरे सरकारविरुद्ध आगपाखड केली. तर काहींनी हातामध्ये फलक घेऊन तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा तीव्र निषेध केला. मात्र भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या कुठेही पाहिला मिळाल्या नाहीत. यामध्ये त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरही त्यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ कुठली पोस्ट किंवा प्रतिक्रिया दिली नाही.

त्यामुळे भाजपने एकत्रितपणे महाराष्ट्र सरकारला विरोध करण्याची भूमिका दर्शवली असताना पंकजा मुंडे या वेगळ्या कशा राहिल्या? हा प्रश्न राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरला आहे. तसंच याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा - आदित्य ठाकरे भाजपच्या राजकारणाला म्हणाले Shameful; 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलनाला असं दिलं प्रत्युत्तर

लॉकडाऊन झाल्यापासून पंकजा मुंडे या मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी आहेत. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवरती व राज्यातील कोरोना परिस्थितीवरती ट्विटरवरून व फेसबुकवरून बऱ्याच प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. मात्र भाजप राज्य सरकारच्या विरोधात माझे अंगण माझे रणांगण हे आंदोलन करत असताना पंकजा मुंडे व भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे या कुठेच दिसून आल्या नाहीत. यामुळे मुंडे भगिनींच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. या बाबतीत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

First Published: May 22, 2020 09:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading