धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते - पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते - पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

'राष्ट्रवादीने अनेक घरात भांडण लावण्याचं काम राष्ट्रवादीने केले आहे, आमचं उदाहरण तर जगजाहीर आहे.'

  • Share this:

परभणी 7 एप्रिल : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे सेटिंग आणि तोडपाणी करणार असंही त्या म्हणाल्या. परभणीचे युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी, जिंतूर येथील सभेत त्यांनी ही टीका केली. प्रचारच्या रणधुमाळीत या दोन नेत्यांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरू आहे.

जिंतूर इथं बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं,पण आताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात. धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदारही तोडपाणी करतात, तोडपाणी करणारे हे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत असा घणाघातही त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसवरही पंकजा मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीने अनेक घरात भांडण लावण्याचं काम राष्ट्रवादीने केले आहे, आमचं उदाहरण तर जगजाहीर आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नेत्यांची चमचेगिरी करतात, मुंडे घराण्यात ते घराणेशाही बोलतात पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात अशी टीकाही त्यांनी केली.

First published: April 7, 2019, 6:07 PM IST

ताज्या बातम्या