Home /News /maharashtra /

'सरकार पडणार की नाही याच्या बाहेर या, विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत जा' पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

'सरकार पडणार की नाही याच्या बाहेर या, विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत जा' पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

पंकजा मुंडे फाईल फोटो

पंकजा मुंडे फाईल फोटो

Pankaja Munde on BJP: पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतानाच भाजपलाही घरचा आहेर दिला आहे.

    बीड, 15 ऑक्टोबर : बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर (Bhagwan Bhaktigad) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dussehra Melava) पार पडला. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करुन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर  जोरदार हल्ला चढवला. यासोबतच भाजपवर टीका करत घरचा आहेर दिला आहे. मराठा - ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू पंकजा मुंडे यांनी म्हटलं, मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल यावर मी आवाज उठवणार आहे. कारण, ओबीसी समाज आणि मराठा समाजात भांडण लावण्याचं काम सुरू आहे. मराठा समाज शिक्षणाचं आरक्षण मागतो तर ओबीसी राजीकय आऱक्षण मागत आहे. दोघांची भांडणं नाहीयेत, हे दोन्ही मिळूनच बहूजन समाज आहे. भाजपला घरचा आहेर  विरोधी पक्षातील प्रत्येक जण म्हणतोय हे सरकार पडणार आणि सत्तेतील लोक म्हणतात आमचं सरकार खंबीर आहे. सराकर पडणार आणि नाही पडणार याच्या बाहेर तुम्ही येणार की नाही? सरकार पडणं आणि मजबूत आहे महत्त्वाचं नाही जनतेसाठी काय करता यावर बोला असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. वाचा : 12 डिसेंबरला ऊसाच्या फडात जाणार आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधणार - पंकजा मुंडे जनतेला दु:खी करण्याचं काम सुरू आहे उद्धव ठाकरे यांचाही आज मेळावा आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मी आतूर आहे. आज ते सुद्धा जनहिताच्या काही योजना आणि खंबीर भूमिका घेतील अशी मला अपेक्षा आहे. कारण तीन पक्षांचं सरकार चाललं आहे. एकमेकांना खुश करण्याच्या नादात जनतेला दु:खी करण्याचं काम सुरू आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या काय घोषणा येतील जनतेसाठी. काय खंबीर भूमिका उद्धवजी ठाकरे घेतील याकडेही मी पाहत आहे असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं. 12 डिसेंबरला ऊसतोड कामगारांशी संवाद साधणार पंकजा ताई घरात बसल्या आहेत म्हणत जे खूष आहेत त्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी 17, 18,19 दिल्लीला आहे. त्यानंतर 23, 24, 25 तारखेला मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याला आहे. नंतर 29, 30, 31 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर आहे. 12 डिसेंबरला ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारांच्यासोबत मी गावागावात जाऊन संवाद साधणार आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. धनंजय मुंडेंवर घणाघात कोरोना होता, लोकांना कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते. अशी नागरिकांची अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते का? मी दौरे करुन तुमचं आरोग्य धोक्यात टाकायचं होतं का? तमुची काळजी वाटली म्हणून घरात बसली नाही तर कोविड सेंटर सुरू केलं. कोरोना संकटात नागरिकांना बेड, औषधे उपलब्ध करुन दिली. अतिवृष्टी झाली तेव्हा दौरा केला आणि दसऱ्याच्या आधी पॅकेज जाहीर करण्याचं म्हटलं, केलं की नाही दसऱ्यापूर्वी पॅकेज जाहीर. केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तेवढी नरेंद्र मोदींची मदत येत आहे. राज्य सरकारची आली का मदत? पालकमंत्र्यांची मदत आली का? हे असं आहे त्यामुळे यांना काही बोललं की राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? आम्ही सरकारकडेच मागणार ना? तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचे नुसत्या धमक्या... असं करेन अन् तसं करेन.. आता काय आहे बीड जिल्ह्याची अवस्था. अरे आपलं मंत्रिपद यांनी भाड्याने दिलं आहे, यांचं काही चालत नाही अशी परिस्थिती आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर घणाघात केला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    पुढील बातम्या