पंकजांची जीभ घसरली.. स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं

पंकजांची जीभ घसरली.. स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं

सर्जिकल स्ट्राईकवर जे कोणी प्रश्न उपस्थित करतात त्यांना त्या एखाद्या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये सोडलं पाहिजे, असे सांगत धनंजय मुंडे यांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिले.

  • Share this:

जालना, 21 एप्रिल- 'सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधीला पाठवायचं होतं दुसऱ्या देशामध्ये मग कळले असतं, असे वादग्रस्त विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातील जामखेड येथे भाजपप्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

सभेला संबोधित करताना पंकजा यांची जीभ घसरली. त्यांनी राहुल गांधी यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.  कोणीही लोकल नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. सर्जिकल स्ट्राईकवर जे कोणी प्रश्न उपस्थित करतात त्यांना त्या एखाद्या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये सोडलं पाहिजे, असे सांगत धनंजय मुंडे यांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिले.

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारतोफा रविवारी थंडावणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराची शेवटची सभा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. दानवे हे प्रकृती अस्वास्थामुळे रॅली ऐवजी कार्यकर्त्यांची मिटिंग आणि प्रचारसभामध्येच हजेरी लावत आहेत.

..तर काँग्रेस नेत्याला रॉकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं, फडणवीसांनीही खोचक टीका

लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी उदगीर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर झाली होती. यावेळी फडणवीस यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. 'बालाकोट हल्ल्याबाबत कॉंग्रेसने पुरावे मागितले, हे जर आधीच माहीत असतं तर त्यांच्या एका नेत्याला विमानातल्या रॉकेटला बांधून सोडलं असतं आणि पुरावा दिला असता', अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली होती.

पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा..

मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाकिस्तानचा जोरदार समाचार घेतला. पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा देश आहे.  पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे ४०  जवान शहीद झाले. आपल्या देशाची मोठी हानी झाली. त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला परवानगी दिली. लष्कराने पहाटे हल्ला करून बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता.

First published: April 21, 2019, 5:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading